Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

Virat Kohli Breaks Ricky Ponting Record: क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीची बॅट तळपली की अनेक विक्रम मोडले जातात. मात्र, यावेळी अवघ्या ७ धावा करूनही कोहलीने इतिहास रचला आहे.
Virat Kohli World Record
Virat Kohli World RecordDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीची बॅट तळपली की अनेक विक्रम मोडले जातात. मात्र, यावेळी अवघ्या ७ धावा करूनही कोहलीने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराटला मोठी खेळी करता आली नाही. पण या छोटेखानी खेळीदरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यामुळे मैदानावरून लवकर माघारी परतूनही विराटची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे.

अवघ्या ७ धावांवर विराट कोहली बाद

शनिवारी वेलिंग्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याला केवळ ७ धावा करता आल्या. त्याने ७ चेंडूंचा सामना करताना एक चौकार लगावला.

वेगवान गोलंदाज जेकब डफीने डावातील चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटला बाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेर असलेल्या चेंडूवर विराटने ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू थेट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या विल यंगच्या हातात गेला. त्यामुळे विराटला माघारी परतावे लागले.

Virat Kohli World Record
Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला

विराट कोहलीने या सामन्यात केवळ ७ धावा केल्या असल्या, तरी त्याच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगला मागे टाकले.

विराटने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत ३८ वनडे सामने खेळले असून ५६.५१ च्या सरासरीने १,९७८ धावा केल्या आहेत. या धावांमध्ये त्याच्या ७ शतकांचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१० मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता.

दुसरीकडे, रिकी पाँटिंगने न्यूझीलंडविरुद्ध ५१ वनडे सामन्यांमध्ये ४५.८३ च्या सरासरीने १,९७१ धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर ६ शतके आणि १२ अर्धशतके आहेत. आता विराटने पाँटिंगच्या तुलनेत सात धावा अधिक करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Virat Kohli World Record
Goa Diwali Special: कागदी फुलांत गुंफली तीन पिढ्यांची परंपरा! लक्ष्मीपूजनाच्या हारांचा पणजीत आजही दरवळ
Virat Kohli World Record
Virat Kohli World RecordDainik Gomantak

पहिल्या वनडेतच विराटने केली होती विक्रमाची बरोबरी

या विक्रमासाठी विराटला दुसऱ्या वनडे सामन्यात फार मोठी खेळी करण्याची गरज नव्हती. ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने ७४ धावांची शानदार खेळी केली होती. त्या खेळीदरम्यान त्याने पाँटिंगच्या १,९७१ धावांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ७ धावा करताच त्याने पाँटिंगला मागे टाकले आणि अव्वल स्थान पटकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.