Parag Desai: गोव्यातील युवकाची कमाल; थेट चंद्रावर खरेदी केली जमीन

लुनार एम्बॅसीकडून विकत घेतली एक एकर जमिन
Goan Youth Parag Desai buy land on Moon
Goan Youth Parag Desai buy land on MoonDainik Gomantak

Goan Youth Parag Desai buy land on Moon: गोव्यातील एका युवकाने थेट चंद्रावर जमिन खरेदी केली आहे. पराग देसाई असे या युवकाचे नाव आहे. तो मूळचा ठाणे वाळपई (ता. सत्तरी) येथील रहिवासी आहे. सध्या तो जर्मनीत वास्तव्यास आहे.

परागने नुकताच चंद्रावरील जमिन खरेदीबाबतचा हा करार केला आहे. चंद्रावरील मॅनिलियस क्रेटर या ठिकाणी परागने ही जमिन खरेदी केली आहे. 'दैनिक गोमंतक'शी बोलताना पराग म्हणाला की, मी चंद्रावर एक एकर जमिन खरेदी केली आहे. लुनार एम्बॅसीकडून ही जमिन खरेदी केली आहे.

Goan Youth Parag Desai buy land on Moon
Goa School Diwali Holiday: गोव्यातील शाळांच्या दिवाळी सुट्टीत बदल; जाणून घ्या नव्या तारखा...

चंद्रावरील जमिन खरेदीच्या संकल्पनेबाबतही परागने माहिती दिली. तो म्हणाला की, चंद्राच्या पृष्ठभागावरील तुम्ही तुमच्या मालकीची जमिन खरेदी करू शकता. या चांद्रजमिन खरेदीमुळे मी आता अधिक मोठ्या विश्वाशी जोडलो गेलो आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मानवाची सध्याची प्रगती पाहता तसेच स्पेस टेक्नॉलॉजीमधील बदल पाहता भविष्यकाळात मानव चंद्रावर वसाहत निर्माण करेल, असे वाटते. आणि तिथूनच चंद्राच्या पृष्ठभागावर विविध कामे, संशोधन केले जाईल.

Goan Youth Parag Desai buy land on Moon
Goa PWD: गोव्यातील 29 ब्लॅक स्पॉट दुरूस्त करणार; रस्ते अपघात टाळण्यासाठी PWD खर्च करणार 435 कोटी रूपये...

पराग म्हणाला की, चंद्रावर जमिन खरेदी करणे हे मानवाच्या महत्वाकांक्षेला, मानवाच्या नाविन्याची ओढ असलेल्या वृत्तीला पाठिंबा देणारी कृती आहे बाकी काहीही नाही. मानवाच्या इच्छा आणि जे माहिती नाही ते माहिती करून घेण्याचा ध्यास या वृत्तीला यामुळे पाठबळ मिळेल.

लुनार एम्बॅसीची मालकीला कशा पद्धतीने मान्यता दिली जाईल, हे भविष्यातील आंतरराष्ट्रीय करारांवर अवलंबून असेल, असेही पराग देसाई म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com