Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Maharashtra vs Goa T20: श्रेया परब हिने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक नोंदविताना विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण अखेर ते व्यर्थ ठरले.
Maharashtra vs Goa T20
Women’s T20Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: श्रेया परब हिने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक नोंदविताना विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण अखेर ते व्यर्थ ठरले. सीनियर महिला टी-२० क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राने गोव्यावर १२ धावांनी मात केली.

स्पर्धेच्या एलिट अ गटातील अखेरचा साखळी सामना शुक्रवारी गुजरातमधील सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर झाला. श्रेया ५२ धावांवर नाबाद राहिली. तिने ४७ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार मारले. महाराष्ट्राने दिलेल्या १४२ धावांच्या आव्हानासमोर गोव्याला ६ बाद १२९ धावाच करता आल्या. गोव्याचा हा सात सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. अन्य चार सामने जिंकल्यामुळे त्यांचे १६ गुण कायम राहिले. महाराष्ट्राने पाचव्या विजयाची नोंद करताना गुणसंख्या २० वर नेली.

Maharashtra vs Goa T20
Goa Diwali Special: कागदी फुलांत गुंफली तीन पिढ्यांची परंपरा! लक्ष्मीपूजनाच्या हारांचा पणजीत आजही दरवळ

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ७ बाद १४१ (मुक्ता मगरे ३४, तेजल हसबनीस २९, श्वेता माने नाबाद ३६, शिखा पांडे ४-१-२१-१, मेताली गवंडर १-०-१-१, पूर्वा भाईडकर ४-०-३७-०, सुनंदा येत्रेकर ४-१-३३-२, श्रेया परब ३-०-२७-०, तेजस्विनी दुर्गड ४-०-२१-२) वि. वि. गोवा : २० षटकांत ६ बाद १२९ (हर्षिता यादव २०, तेजस्विनी दुर्गड ०, पूर्वजा वेर्लेकर १७, श्रेया परब नाबाद ५२, शिखा पांडे १७, विनवी गुरव ९, पूर्वा भाईडकर ३, सुनंदा येत्रेकर नाबाद ७, श्रद्धा पोखरणकर १-२४, भक्ती मिरजकर १-१७, मुक्ता मगरे १-२०, ज्ञानेश्वरी पाटील १-१७).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.