Goa Health Minister Vishwajit Rane On Breast Cancer Test: गोव्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा कर्करोग) ची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यातून दोन वर्षांत एक लाख महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
विश्वजीत राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिला आणि महिलांचे आरोग्य हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. राज्यात सशक्त महिला सशक्त गोवा ही योजना 2021 पासून सुरू आहे. या योजनेत ऑक्टोबर महिना हा कॅन्सर जागृती महिना म्हणून साजरा केला जाणार आहे.
यात ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी केली जाणार आहे. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात ही सुविधा दिली जाईल. त्यासाठीची 'आय ब्रेस्ट एक्झाम' ही यंत्रणा प्रत्येक आरोग्य केंद्रात पोहचवली आहे.
तेथील कर्मचाऱ्यांना आणि समुपदेशकांना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. आय ब्रीस्ट एक्झाम उपकरण कसे हाताळायचे याची माहिती दिली आहे.
या प्रकल्पाला एसबीआय फाऊंडेशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँक अँड फायनान्स या संस्थांनी आर्थिक पाठबळ दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.