kunbi gram project Dainik Gomantak
गोवा

Kunbi Gram Project :कुणबी ग्राम प्रकल्पासाठी गोवा सरकार DCPL ला देणार ४३ लाखांचे मानधन

आराखड्याचे काम डीसीपीएल या कंपनीला देण्‍याचे ठरविले असून या संबंधीची निविदा एका महिन्‍याच्‍या कालावधीत तर कामाचा आदेश तीन महिन्‍यांच्‍या कालावधीत निघणारआहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: केंद्र सरकारच्‍या मदतीतून सांगे येथे उभारण्यात येणाऱ्या कुणबी ग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पासाठी सल्‍लागार म्‍हणून दाराशो ॲण्‍ड कंपनी प्रा. लि. (डीसीपीएल) या कंपनीला नेमण्‍यात आले असून या कुणबी ग्राम प्रकल्‍पाचा आराखडा तयार करण्‍यासाठी गोवा सरकार डीसीपीएल या कंपनीला ४३ लाख रुपये देणार आहे.

केंद्र सरकारच्‍या हस्‍तकला, हातमाग आणि कॉयल खात्‍यातर्फे हा प्रकल्‍प मंजूर झाला असून गोवा हस्‍तकला महामंडळाची या प्रकल्‍पासाठी अंमलबजावणी आस्‍थापन म्‍हणून नेमणूक केली आहे. या संदर्भात हल्‍लीच झालेल्‍या एका बैठकीत या प्रकल्‍पाच्‍या आराखड्याचे काम डीसीपीएल या कंपनीला देण्‍याचे ठरविले असून या संबंधीची निविदा एका महिन्‍याच्‍या कालावधीत तर कामाचा आदेश तीन महिन्‍यांच्‍या कालावधीत निघणारआहे.

ज्‍या कंपनीला सल्‍लागार म्‍हणून नेमण्‍यात आले आहे, तिच्‍याकडून निविदा तयार करणे, त्‍यासाठी संमती मिळविणे आणि बोलीदाराची नेमणूक करणे ही कामे सोपवली आहेत. या प्रक्रियेसाठी ४५ ते ६० दिवस लागत असले तरी एका महिन्‍यात हे काम करण्‍याची अट त्‍यांना घातलीआहे. या सल्‍लागार कंपनीला प्रकल्‍पाचे डिझाईन, प्रकल्‍पाचा खर्च आणि प्रकल्‍प कशा तऱ्हेने कार्यान्वित करावा, याचा संपूर्ण आराखडा तयार करण्‍याचे काम दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT