Goa DGP On Canada Advisory: सुरक्षित असल्यामुळेच परदेशी पर्यटकांनी विशेषत: महिलांनी नेहमीच गोव्याला प्राधान्य दिले आहे. कॅनडाच्या उच्चायुक्तांनी आपल्या नागरिकांना दिलेल्या सूचना वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असे गोव्याचे पोलीस महासंचालक (DGP) जसपाल सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
"भारत आणि कॅनडात वाद निर्माण झाल्यानंतर कॅनडाच्या वतीने त्यांच्या नागरिकांसाठी दिल्ली आणि गोव्याला जाताना सावधगिरी बाळगण्याची सूचना केलीय. या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, गोव्याबाबत त्यांचे हे वक्तव्य तथ्यांवर आधारित नाही," असे सिंग म्हणाले.
"चालू वर्षात 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात फक्त एकच घटना घडली आहे. नेदरलँडमधील महिला पर्यटकाच्या बाबतीत एक घटना घडली होती, याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये केवळ दोन प्रकरणे होती. एक रशियन नागरिकाशी संबंधित आहे आणि दुसरा ब्रिटिश नागरिकाशी संबंधित आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली," असे सिंग म्हणाले आहेत.
त्यामुळे कॅनडाने प्रसिद्ध केलेल्या सूचना तथ्यांवर आधारित नाहीत, असे सिंग यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, गोव्याला येणार्या विविध देशांतील पर्यटकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल नेहमीच गोव्याचे कौतुक केले आहे, असे त्यांनी म्हटलय.
महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी 2015 मध्ये कॅनडाच्या नागरिकाविरुद्ध गुन्हा घडला होता. त्यानंतर कोणताही कॅनडाच्या नागरिकाविरोधात गुन्हा घडलेला नाही, असे सांगत त्यांनी कॅनडाने दिलेल्या सूचना तथ्यहिन असल्याचे म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.