Goa Loksabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha: निष्पक्ष निवडणुकीसाठी गोव्याकडून निमलष्करी दलाच्या 14 कंपन्यांची मागणी

Goa Loksabha Election 2024: गोव्यात लोकसभेच्या दोन जागा असून, या दोन जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे.

Pramod Yadav

Goa Loksabha Election 2024

गोव्यात निष्पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने निमलष्करी दलाच्या 14 कंपन्यांची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गोव्यात लोकसभेच्या दोन जागा असून, या दोन जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, गोव्याला निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) रमेश वर्मा यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही केंद्राकडे निमलष्करी दलाच्या 14 कंपन्यांची मागणी केली आहे, त्यापैकी दोन यापूर्वीच आम्हाला देण्यात आल्या आहेत.'

मतदानाच्या दिवशी गोवा सरकारकडून केंद्रीय दलांव्यतिरिक्त आठ हजार स्थानिक पोलिस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या. या बैठकीला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

गोव्यात एकूण 11,73,016 मतदार

गोव्यात नव्याने 25,209 मतदार पहिल्यांदाच मतदान करतील, ज्यात उत्तर 12,070 आणि दक्षिण गोव्यातील 13,139 मतदारांचा समावेश आहे.

गोव्यात एकूण 11,73,016 मतदार असून त्यापैकी 5,77,958 उत्तर गोव्यात आणि 5,95,058 दक्षिण गोव्यात आहेत. त्यापैकी 5,68,501 पुरुष आणि 6,04,515 महिला मतदार आहेत.

राज्यात एकूण 1,725 ​​मतदान केंद्रे असतील, ज्यात उत्तर गोव्यात 863 आणि दक्षिणेत 862 मतदान केंद्र असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT