satari News  daibik Gomantak
गोवा

'गोवा संपर्क यात्रा' माध्यमातून राज्यपालांनी दिली 60 टक्के गावांना भेट

राज्यपाल पिल्लई यांनी आज सत्तरी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचाशी साधला संवाद

दैनिक गोमन्तक

वाळपई: लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ असते. जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सरकारमार्फत सोडविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील समस्या या संदर्भात अनुभव घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण गेल्या सहा महिन्यापासून करीत आहे. गोवा संपर्क यात्रेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यात 220 गावांना भेटी दिलेल्या आहेत. यामुळे 60 टक्के भागांमध्ये यात्रा पूर्ण झालेली आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.

(Goa Governor Sreedharan Pillai visited 60 percent villages in goa through 'Goa Sampark Yatra')

येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये राज्यातील सर्व गावांना भेटी देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल. राजभवनचा निधी हा जनतेच्या सुखदुःखासाठी वापरण्यात येईल असे प्रतिपादन गोवा राज्याचे राज्यपाल पी.श्रीधरन पिल्लई यांनी केले. ते सत्तरी तालुक्यातील नवनिर्वाची सरपंच, पंच सभासद यांच्याशी वाळपई येथे आमदार विश्वजित राणे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संवादाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, निसर्गरम्य सत्तरीचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तरीच्या विकासात राणे पिता पुत्रांचा वाटा महत्वाचा असून दोघांनी जनतेसाठी दिलेले योग्यदान हे कौतुकास्पद आहे. आपण आजपर्यंत अनेक राज्यात काम केले आहे. पण गोवा असा राज्य आहे जेथे सर्व एकत्र येऊन नाते जोडत आहे. कोणताही विकास करताना मतभेत विसरुन एकत्र आले तर, समाजाचा विकास होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सत्तरी तसेच गोव्याचा विकास झपाट्याने झाला. असे ही ते यावेळी म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर पर्ये आमदार तथा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव देसाई राज्यपालांचे खास सचिव मिहिर वर्धन, सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रविण परब, वाळपई नगराध्यक्षा शेहजीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, सत्तरी तालुक्याचे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे व कार्यक्रमाचे संयोजक विनोद शिंदे आदींची उपस्थिती होती.

गोवा राज्यपालाची जबाबदारी स्विकारल्यानंतर राजभवनचा निधी हा पूर्णपणे जनतेसाठी वापरण्याचा निर्णय आपण घेतला व आतापर्यंत डायलिसिस रुग्ण व कर्करोग रुग्ण यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण खर्च केलेला आहे. 220 जणांना याचा आतापर्यंत फायदा झालेला आहे. तर समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यरत असलेल्या समाजसेवी संस्थांसाठी राजभवनचा निधी देण्यात आलेला आहे‌.

याचा आतापर्यंत 71 समाजसेवी संस्थांना फायदा झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी व राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी समाजाच्या विकासाला वेगवेगळ्या माध्यमातून चालना दिलेली आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपली लोकशाही मजबूत होणे अत्यंत गरजेचे आहे.

राज्यपालांनी उपस्थित सर्व पंच सरपंचाशी संवाद साधला

डॉ. दिव्या राणे यांनी बोलताना सत्तरीतील विविध विकास कामे तसेच येणाऱ्या काळात सत्तरीतील मंदिर व पर्यटक स्थळांची माहिती सविस्तरपणे करुन दिली. गोव्याचे जीवनशैली झपाट्याने बदलू लागलेली आहे. तरीसुद्धा गोवेकरांना अजून पर्यंत आपली संस्कृती संवर्धनाची प्रक्रिया बंद केलेले नाही. अंजुणे धरण प्रकल्प, होंडा, पिसुर्ले, या ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करण्यात त्याने विशेष योगदान दिले होते.

इको टुरिझमच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये पर्यटन विकासाची चळवळ निर्माण करणार आहे. नदी नाले व सुंदर निसर्ग सौंदर्य ही सत्तरीची वेगळी ओळख आहे .ब्रह्मकरमळीचे ब्रह्मदेव मंदिर ,पश्चिम घाटाचा समृद्ध इतिहास सांगणारे वाघेरी डोंगर, गोवा व देशाच्या स्वतंत्र चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे स्वतंत्र सैनिक दिपाजी राणे, दादा राणे यांची पुण्याई या भूमीला लाभलेली आहे.

मार्गदर्शन करताना सत्तरीतील विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी वेळी सत्तरी तालुक्यातील डायलिसिस रुग्ण जुबेदा शेख, संतोष गावस, चंद्रकांत पार्सेकर व गोपाळकृष्ण पर्येकर आदींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन निधीतून आर्थिक धनादेश प्रदान करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT