Vijai Sardesai: गोवा बनत आहे 'गँग ऑफ वासेपूर'

विजय सरदेसाई: मुख्यमंत्री फक्त विरोधकांना फोडण्यात दंग
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

मडगाव: सोनाली फोगाट खून, मांडवीत एका युवकाला आलेला संशयास्पद मृत्यू, कुडचडे येथे रेती माफियाकडून झालेला खून आणि वास्को येथे काल दिवसाढवळ्या झालेली हत्या. ही सर्व मालिका पाहिल्यास गोवा हे गुन्हेगारांचे नंदनवन झाले आहे. असेच म्हणावे लागेल अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

(Goa Forward Party President Vijai Sardesai criticizes Goa Chief Minister Pramod Sawant)

Vijai Sardesai
राज्यभर चर्चेत आलेली मांद्रे पंचायत सरपंच निवड बिनविरोध

गोवा आता 'गँग ऑफ वासेपूर' बनत आहे कारण गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, ती जागेवर घालण्याऐवजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत विरोधकांना फोडण्यात गर्क झाले आहेत अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यासाठीच त्यांनी या पदावरून पायउतार व्हावे अशी आम्ही मागणी केली होती असे ते म्हणाले.

Vijai Sardesai
Anjuna Crime: हणजूण कार्लिस शॅक परिसरात आढळला मानवी मृतदेह

या अशा तकलादू सरकारात काँग्रेस पक्षाचे आमदार का सामील होऊ पाहतात हेच कळत नाही? असे सांगून जो मुख्यमंत्री गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाहीत त्यांच्या सरकारात सामील होऊन हे आमदार काय करणार हे आता त्यांना लोकांनीच विचारण्याची गरज आहे असे सरदेसाई म्हणाले.

काँग्रेसचे आमदार भाजपात आलेले खुद्द भाजपच्या आमदारांनाही नको आहेत. मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातून विरोधी पक्षच नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. असे वाटते असे सरदेसाई म्हणाले. गेले काही दिवस राज्यात सुरु असलेल्या प्रकरणांना समोर ठेवक देसाई यांनी राज्य सरकारला घेरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com