Goa Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीवरील 60 कोटींचा खर्च पाण्यात! अजून 25 कोटी लागणार; तांत्रिक कामे निकृष्ट, समितीचा अहवाल सादर

Kala Academy renovation: त्रुटी दूर करण्यासाठीचा हा खर्च कंत्राटदारांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली असली तरी मूळ खर्च वाया गेल्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न आहे.

Sameer Panditrao

पणजी: सरकारने कला अकादमी वास्तूच्या नूतनीकरणावर खर्च केलेले ६० कोटी रुपये पाण्यात गेल्यात जमा झाले आहेत. याप्रकरणी सरकारने नेमलेल्या कृती दल समितीच्या अहवालात बोट ठेवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणखीन २५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

हा अहवाल आज समितीचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला. त्रुटी दूर करण्यासाठीचा हा खर्च कंत्राटदारांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली असली तरी मूळ खर्च वाया गेल्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न आहे. त्याहीपुढे समितीने दाखवलेल्या त्रुटी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी मान्य करणार का, की कला अकादमीची त्रुटीपूर्ण वास्तू रसिकांच्या माथी मारणार, हाही प्रश्न ठळकपणे पुढे आला आहे.

याशिवाय खुल्या नाट्यगृहाच्या कोसळलेल्या वास्तूच्या पुनर्बांधणीसाठीही सरकारला अंदाजे ४० कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे या गलथान कारभाराची जबाबदारी सरकार कोणावर निश्चित करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वास्तुविशारद राजन एस. भिसे यांनी दिलेल्या शिफारशी अशा...

१.काढलेल्या ‘ए’ रांगेतील खुर्च्या पुन्हा बसवा.

२.ध्वनिविषयक सल्लागाराची नियुक्ती करा आणि ८ इंच उंचीपर्यंतच्या भिंतीवर वॉल पॅनेल लावा.

३. ‘एफओएच’कडे जाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी एसी डक्ट काढून टाका, जो मार्ग अडवत आहे.

४. एसी आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटनुसार एसी युनिट्स पुन्हा स्थापित करा.

५. नवीन एसी डक्टनुसार खोटे छत पुन्हा डिझाईन करा.

६. मुख्य कर्टन मॅकेनिझम दुरुस्त केले पाहिजे. विंग्ज आणि फ्लाईज पुन्हा स्थापित करा; कारण ते व्यवस्थित डिझाईन केलेले नाहीत.

७. अज्ञात कारणांमुळे, विंग एरियामध्ये कार्पेट टाकण्यात आले आहे, ते सेट्स हलवणे सोपे करण्यासाठी काढले पाहिजे.

८.स्टेजच्या भिंतीवर देखील ८ इंच उंचीपर्यंत ध्वनी पॅनेल असावेत.

९. लाईट बारची स्थिती तपासा आणि वायरिंगची पूर्णपणे पाहणी करा.

१०. मेकअप रूममधील दिवे पुन्हा विचारात घ्या आणि प्रोफाईल एलईडी दिवे लावा. चांगल्या दर्जाच्या खुर्च्या आणि सोफे बसवा.

११. ब्लॅक बॉक्सच्या भिंतीवर ८ इंच उंचीपर्यंत ध्वनी पॅनेल लावा.

१२. येथे दिव्यांची व्यवस्था नाही. तज्ज्ञांच्या गरजेनुसार आपल्याकडे दिवे आणि वायरिंगसह लाईट ग्रीड असणे आवश्यक आहे.

१३. संपूर्ण प्रकाशयोजना प्रणाली स्थापित केल्यानंतर ऑपरेटर केबिनचे स्थान पुन्हा विचारात घेतले पाहिजे.

१४. खुल्या नाट्यगृहासाठी योग्य स्ट्रक्चरल कन्सल्टंटची नियुक्ती करा आणि स्लॅबची पुनर्बांधणी करा.

१५. आम्ही स्टेज एरियात प्रवेश करू शकलो नाही; कारण तो बंद होता. परंतु मलबा हटवल्यानंतर स्टेज एरिया आणि मेकअप रूमची तपासणी करणे आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास ते करावे लागेल.

१६. लाईट बार स्थापित केले पाहिजेत आणि योग्य वायरिंग केले पाहिजे.

१७. तज्ज्ञांच्या गरजेनुसार योग्य ध्वनिप्रणाली स्थापित केली पाहिजे.

१८. स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याची आवश्यकता आहे.

अहवालाचा अभ्यास करू : मुख्यमंत्री

कलाकार आणि कलारसिकांना ज्याची दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती, तो सद्यस्थितीतील कला अकादमीच्या वास्तूसंबंधीचा तसेच मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरातील तांत्रिक साधनसुविधा संबंधीचा अहवाल सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केला.‌ मुख्यमंत्री सावंत यांनी या अहवालाचा अभ्यास करून त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन टास्क फोर्सला दिले आहे.‌

तांत्रिक कामाचा दर्जा निकृष्ट

कला अकादमीच्या वास्तूचे नूतनीकरण झाल्यानंतर तेथील उणिवांबद्दल कलाकार आणि कलारसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात नूतनीकरणानंतर जे कार्यक्रम झाले, त्यात आलेल्या तांत्रिक अडथळ्यांसंबंधी अनेक तक्रारी कलाकार तसेच उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केल्या होत्या. या तक्रारींची दखल राष्ट्रीय स्तरावर देखील घेण्यात आली होती. प्रचंड पैसा खर्च करून नूतनीकरण केलेल्या या नाट्यगृहातील तांत्रिक कामाचा दर्जा फारच वाईट आहे, असे आरोप सातत्याने होत राहिले आहेत.

कंत्राटदार २५ कोटी खर्च करणार का?

टास्क फोर्सच्या तज्ज्ञांकडून सादर झालेल्या अहवालानुसार जर कला अकादमीत सुधारणा केली तर किमान २० ते २५ कोटी रुपये पुन्हा खर्च करावे लागतील, असा सहज अंदाज काढता येतो.‌ जरी हा खर्च जुन्या कंत्राटदारांकडून वसूल करून घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जाहीर केलेले असले तरी ते शक्य असेल का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. कारण २० ते २५ कोटी रुपये स्वतःचे पैसे खर्च करून कंत्राटदार का म्हणून कला अकादमीची पुन्हा दुरुस्ती करील?

अनेक प्रश्‍न अनुत्तरीत

कंत्राटदाराच्या चुकीमुळे जर कला अकादमीच्या बाबतीत पुन्हा एवढा प्रचंड खर्च करावा लागत असेल तर त्यावर देखरेख ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची किंवा ताजमहालचा दाखला देणाऱ्या राजकारण्यांची देखील चूक ठरत नाही का? टास्क फोर्सच्या अहवालातून असे अनेक गंभीर प्रश्‍‍न निर्माण झाले आहेत.

तज्ज्ञ शीतल तळपदे यांनी केलेल्या सूचना

मुख्य सभागृहात

ए) बटनमधील दिवे - यात मोल्फेस, एलईडी पीएआर आणि एलईडी रंग बदलणारे दिवे (डिजिटल) समाविष्ट आहेत.

ए) आवश्यक दिव्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे; कारण सभागृह विविध प्रकारच्या परफॉर्मन्स कलांसाठी वापरले जात आहे.

ए) प्रत्येक बटनवरील दिव्यांची संख्या सध्याच्या संख्येच्या दुप्पट करणे.

वास्तुविशारदकांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या बटनची स्थिती योग्यरित्या दिवे लावण्यासाठी बदलणे आवश्यक आहे. उर्वरित बटनची स्थिती देखील बदलली जाऊ शकते.

सायक्लोरामाजवळील बटनवर ६ सायक्लोरामा रंग बदलणारे दिवे स्थापित करणे आवश्यक आहे.

मागील बटनवर १० एलईडी रंग बदलणारे दिवे स्थापित करणे आवश्यक आहे.

बी) कॅटवॉकमधील दिवे - यात प्रोफाईल आणि सामान्य दिव्यांसारखे दिवे समाविष्ट आहेत.

बी) दिव्यांच्या संख्येत अधिक प्रोफाईल, एलईडी पीएआर आणि एलईडी रंग बदलणारे दिवे समाविष्ट करावेत. मानवी सुरक्षितता लक्षात घेऊन दिवे लावण्यासाठी आणि फोकस करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. कॅटवॉकपर्यंत पोहोचण्याचा मार्ग योग्य असणे आवश्यक आहे.

बी) कॅटवॉकवरील दिव्यांची संख्या सध्याच्या संख्येच्या दुप्पट करणे.

Kala Academy | Pramod Sawant And Govind Gaude

सी) बाजूच्या विंगमधील दिवे - यात एलईडी कलर पीएआर आणि एलईडी पीएआर समाविष्ट आहेत, जे संपूर्ण स्टेज झाकण्यासाठी पुरेसे नाहीत.

सी) दिव्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

सी) प्रत्येक बाजूच्या विंगमध्ये २ पीएआर कॅन्स आणि २ एलईडी रंग बदलणारे दिवे स्थापित करणे आवश्यक आहे.

डी) सामान्य फेस दिवे - यात वरच्या बटनमधून येणारे मोल्फेस ब्लाइंडर्स आहेत.

ई) ऑपरेटींग कोन्सूल योग्य स्थितीत नाही.

एफ) अल्टरनेटीव्ह पॉवर सोर्स

डी) दिव्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. ई) सभागृहात स्थापित दिव्यांसाठी योग्य असलेले डिजिटल कोन्सुल आणि बॅकअप डिजिटल कोन्सुल स्थापित करणे आवश्यक आहे. प्रकाश अभियंते आणि प्रशिक्षित प्रकाश कर्मचारी नियुक्त/भाड्याने घेणे आवश्यक आहे. परफॉर्मन्स योग्य प्रकारे पाहता यावा यासाठी डिजिटल कोन्सुलचे स्थान तळमजल्यावर हलवणे आवश्यक आहे. एफ) परफॉर्मन्समध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी विद्यमान प्रकाश प्रणालीशी जोडलेला योग्य जनरेटर असणे आवश्यक आहे.

डी) पहिल्या दोन बटनांवर ४ मोल्फेस दिवे स्थापित करणे आवश्यक आहे. ई) स्टेजजवळच्या पीटमध्ये दोन डिजिटल कोन्सुल स्थापित केले आहेत, जे या सभागृहासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे कोन्सुल रूमचे स्थान बदलण्याची आवश्यकता नाही. एफ) याकडे खूप बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.

जी) अतिरिक्त दिवे - अतिरिक्त स्त्रोतांकडून जसे की फ्लोअर दिवे, स्टॅण्ड दिवे, सायक्लोरामावरील दिवे.

जी) देशाच्या विविध भागांतून प्रवास करणाऱ्या समूह आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी अतिरिक्त दिव्यांची तरतूद करणे आवश्यक आहे.

जी) मुख्य सभागृहाचे बहुउद्देशीय स्वरूप लक्षात घेता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. भेटीच्या वेळी परफॉर्मन्ससाठी तात्पुरते स्थापित केलेले कन्वेन्शनल दिवे आणि पॉवर पॅक्स देखील दिसले, याचे कारण माहीत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT