Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

Smart Transport Goa: उत्तर गोव्‍यातील प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विजेवर चालणाऱ्या १०० बस देण्याचे ठरवले आहे.
Smart Transport Goa
Goa Electric BusesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोव्‍यातील प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विजेवर चालणाऱ्या १०० बस देण्याचे ठरवले आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून मागवला असून आणखीन १०० बस दक्षिण गोव्यासाठी मागण्याचा प्रस्तावही राज्य सरकार पाठवणार आहे.

नगरविकास सचिव यतींद्र मरळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद येथे केंद्रीय नगरविकासमंत्री मनोहर खट्टर यांनी घेतलेल्या बैठकीत हा प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली आहे, त्यानुसार प्रस्ताव तयार करून पाठवण्यात येत आहे. त्याच्या जोडीला दक्षिण गोव्यासाठी १०० बस याच योजनेंतर्गत मागण्यात येणार आहेत.

Smart Transport Goa
Kadamba Electric Bus : इलेक्ट्रिक बससेवेची फेब्रुवारीत चाचणी; ‘कदंब’चा उपक्रम

राज्यातील सार्वजनिक वाहतूक सशक्त करण्यासाठी आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ‘पीएम ई बस सेवा’ योजने अंतर्गत विजेवरील बसचा आधुनिक ताफा आणण्याचा धोरणात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गोवा (Goa) हे प्रशासकीय, व्यापारी व पर्यटन केंद्र आहे. येथे वाहतुकीच्या वाढत्या समस्यांसोबतच वायू व ध्वनी प्रदूषण, तसेच कार्बन उत्सर्जनही प्रचंड प्रमाणात वाढते आहे. राज्यातील शहरी लोकसंख्या ७८.४५ टक्के इतकी असून, फक्त पणजी शहर नव्हे तर इतर शहरी भाग, जनगणना नगर व पालिका क्षेत्रे एकत्र धरून १०० विजेवरील बस सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलवर प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य मिळणार असून, गॅरंटी मॉडेलवर ही सेवा चालवण्यात येणार आहे. स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक वाढवणे, महिलांना अनुकूल वाहतूक पर्याय आणि समावेशकता वाढवणे, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून २०७० पर्यंत नेट-झीरो साध्य करणे, गोव्यातील पर्यटनाला चालना देणे व हरित ओळख निर्माण करणे, नोकरीच्या संधी वाढवणे, ही योजना गोव्यातील इको-फ्रेंडली आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Smart Transport Goa
Electric Bus : नववर्षात पणजीतील रस्त्यांवर आता धावणार रंगीबेरंगी बसगाड्या; 19 जानेवारीपासून सेवेला प्रारंभ

विजेवरील बस सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलवर प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य मिळणार असून, गॅरंटी मॉडेलवर ही सेवा चालवण्यात येणार आहे. स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक वाढवणे, महिलांना अनुकूल वाहतूक पर्याय आणि समावेशकता वाढवणे, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून २०७० पर्यंत नेट-झीरो साध्य करणे, गोव्यातील पर्यटनाला (Tourism) चालना देणे व हरित ओळख निर्माण करणे, नोकरीच्या संधी वाढवणे, ही योजना गोव्यातील इको-फ्रेंडली आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

गोव्यातील वाहतूक स्थिती

गोव्यात वाहन ते लोकसंख्या प्रमाण जवळपास १ः१ आहे.

२०२४ मध्ये, गोव्यात एकूण ८४ हजार ३११ नवीन वाहने नोंदणीकृत झाली.

सार्वजनिक बससेवा कमी संख्येने प्रवास करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.

कदंबच्या ४८३ पैकी ३१० डिझेल बस दहा वर्षांहून अधिक जुन्या आहेत.

४८३ पैकी ४२३ चालू स्थितीत, तर ६० बंद स्थितीत आहेत.

२०२७ पर्यंत २०० बस कायमस्वरूपी सेवेतून काढण्यात येणार आहेत.

बहुतेक रस्ते एकेरी व अरुंद आहेत.

Smart Transport Goa
Electric Bus : कदंबकडे 200 इलेक्ट्रिक बसगाड्यांचा तुटवडा : उल्हास तुयेकर

बऱ्याच बससेवा सायंकाळी लवकर बंद होतात, त्यामुळे प्रवाशांना अडचण निर्माण होते.

८५२ खासगी बस या स्पर्धात्मक भाड्यात सेवा पुरवतात, परंतु बस देखभालीची सोय नाही.

गोव्यात दर १ लाख लोकांमागे २१८ अपघात.

केरळमध्ये ३४, दिल्लीमध्ये ३८, देशात सरासरी ३६ अपघात.

एकूण १२ टक्के प्रवाशांकडून बसचा वापर.

५४ टक्के दुचाकी, २९ टक्के चारचाकी, ५ टक्के तीन चाकी वाहन वापरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com