

पणजी: ‘आदर्श सौर गाव’ उपक्रमाची सुरवात राज्यात १५ गावांत करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या गावांसाठी १ कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे.
गोवा (Goa) उर्जा विकास यंत्रणेचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने पीएम सूर्यघर मोफत वीज योजना राबवताना प्रत्येक जिल्ह्यात एक ‘आदर्श सौर गाव’ निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात घरांच्या छतांवर सौरपट्ट्या (सोलार पॅनल) बसवण्यास मोठी चालना मिळणार आहे. १५ गावांत आता स्पर्धा असून जिल्हावार एक गाव आदर्श सौर गाव म्हणून निवडले जाणार आहे.
‘आदर्श सौर गाव’ या घटकासाठी राष्ट्रीय पातळीवर ८०० कोटी रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे. निवडलेल्या प्रत्येक गावाला १ कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जातील. निवडलेले गाव ‘राजस्व गाव’ असावे आणि तेथे ५,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असावी. विशेष श्रेणीतील राज्यांमध्ये हा निकष २,००० लोकसंख्येपर्यंत लागू आहे. त्यानुसार गावे निवडून काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
योग्य छते आणि त्यांची मजबुती लक्षात घेऊन काम करावे लागेल.
गावातील लोकांना या योजनेचे फायदे समजावून सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे.
सौरपट्टीची गुणवत्ता, वेळेवर दुरुस्ती आणि तपासणी याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
वीज विभाग वराज्य ऊर्जा संस्था यांनी एकत्रितपणे नियोजन केल्यास काम सुकर होईल.
ऊर्जा-स्वावलंबन: गाव स्वतःची आवश्यक वीज सौरऊर्जेतून तयार करून बाहेरच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहणार नाही.
इतर गावांसाठी आदर्श: ‘हे गाव वीज बचत कशी करते’ हे पाहून इतर गावांनाही सौरऊर्जेकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.
स्वच्छ पर्यावरण: सौरऊर्जा वापरल्याने धूर आणि प्रदूषण कमी होईल.
वीज बिलात बचत: घराघरांत वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. अतिरिक्त वीज निर्मिती झाल्यास ती वीज विभागाला देऊन घरांना आर्थिक लाभही मिळू शकेल.
स्थानिक रोजगार: सौरपट्ट्या बसवणे, दुरुस्ती, तपासणी यासाठी गावातच कामाच्या संधी उपलब्ध होतील.
जास्तीत जास्त सौरऊर्जा निर्माण: या योजनेमुळे देशात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेची क्षमता वाढेल.
कोरगाव, धारगळ, थिवी, चोडण, एला, करमळी, लाटंबार्से, मये, बेतोडा,
शिरोडा, दाबोळी, लोटली, वेळ्ळी, खोला आणि पैंगीण
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.