Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Milk Production Deficit: सध्‍या गोवा डेअरीद्वारे दररोज ४५ हजार लिटर दुधाचे उत्‍पादन मिळते. याशिवाय सुमूल व इतर अशा एकूण ९० हजार लिटर दुधाचे उत्‍पादन राज्‍यात मिळते.
Goa Milk Production Deficit
Goa Milk ImportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सद्यस्‍थितीत राज्‍यात दररोज ९० हजार लिटर दुधाचे उत्‍पादन होते. परंतु, राज्‍याला दर दिवशी सुमारे ३.५० लाख लिटर दुधाची आवश्‍‍यकता भासत असल्‍यामुळे २.६० लाख लिटर दुधाची आयात करावी लागते, अशी माहिती गोवा डेअरीचे उपाध्‍यक्ष डॉ. रामा परब यांनी मंगळवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली. राज्‍यातील दूध उत्‍पादनात वाढ करण्‍यासाठी केलेल्‍या मागण्‍यांची सरकारकडून लवकरात लवकर पूर्तता व्‍हावी, अशी मागणी दूध उत्‍पादक शेतकऱ्यांकडून होत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

सध्‍या गोवा (Goa) डेअरीद्वारे दररोज ४५ हजार लिटर दुधाचे उत्‍पादन मिळते. याशिवाय सुमूल व इतर अशा एकूण ९० हजार लिटर दुधाचे उत्‍पादन राज्‍यात मिळते. काही वर्षांपूर्वी दररोज १.२० लाख लिटर दुधाचे उत्‍पादन होत होते. परंतु, गेल्‍या वर्षांत हा आकडा घटला असल्‍याचे डॉ. परब म्‍हणाले. राज्‍यातील दूध उत्‍पादनात वाढ करण्‍याच्‍या अनुषंगाने सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखत आहे. त्‍याचा लाभही शेतकरी घेत आहेत. यातील सुधारित कामधेनू योजनेत काही बदल करून ती अजून सुटसुटीत करण्‍याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

Goa Milk Production Deficit
Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

१ दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना सध्‍या १० जनावरांसाठी ९० टक्‍के सबसिडी देण्‍यात येते. त्‍यात बदल करून सबसिडीअंतर्गत २० पेक्षा अधिक जनावरे देण्‍यात यावीत.

२ दूध सबसिडीवरील आधारभूत किंमत प्रत्‍येक महिन्‍याला १५ तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यांत जमा करण्‍यात यावी.

३ दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना (Farmer) हिरवा चारा उपलब्‍ध करून देण्‍यात यावा.

४ शेतकऱ्यांना जनावरांची निवड करता येत नाही. ठरवून दिलेल्‍या व्‍यक्तींकडूनच ती घ्‍यावी लागतात. त्‍यात बदल करून शेतकऱ्यांना जनावरांचा पुरवठा राष्‍ट्रीय डेअरी सर्व्हिसेसमार्फत (एनडीएस) व्‍हावा. तेथे होणाऱ्या जनावरांच्‍या जिनोम चाचणीमुळे दूधाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना जनावरे घेता येतील.

५राष्‍ट्रीय डेअरी विकास मंडळाने (एनडीडीबी) राज्‍यातील शेतकऱ्यांना जनावरे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी कोपार्डे येथे दोन शेड उभारण्‍याची मागणी सरकारकडे केली आहे. परंतु, या प्रक्रियेला अजूनही गती मिळालेली नाही. सरकारने ‘एनडीडीबी’ला शेड उभारण्‍यासाठी मान्‍यता द्यावी.

६ दूध संस्‍थांच्‍या सचिवांना संस्‍थेकडून वेतन मिळते. ते अल्‍प असते. त्‍यात त्‍यांना सकाळ–संध्‍याकाळ डेअरीत हजार रहावे लागते. सरकारने यात हस्‍तक्षेप करून सचिवांच्‍या वेतनात वाढ करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com