Kala Academy: प्रकाश - ध्वनियंत्रणा भाड्याने आणली, मग खोटा दावा का? ‘कला राखण'कडून अभिनेते मनोज जोशींचा निषेध

Kala Rakhonn Mand: कला अकादमीला सर्टिफिकेट देतानाच गोव्यातील नाट्यरसिकांची दिशाभूल करणाऱ्या नाटकाचे अभिनेते मनोज जोशी यांच्या वक्तव्याचा ‘कला राखण मांड’ने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
Goa Artists Demand Action Kala Academy
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमीच्या नाट्यगृहात झालेल्या ‘चाणक्य’ या नाटकाच्या प्रयोगासाठी आपणास कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, असा खोटा दावा करून कला अकादमीला सर्टिफिकेट देतानाच गोव्यातील नाट्यरसिकांची दिशाभूल करणाऱ्या नाटकाचे प्रमुख अभिनेते मनोज जोशी यांच्या वक्तव्याचा ‘कला राखण मांड’ने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

यासंबंधीचा जोशी यांचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर चौकशी केली असता कला अकादमीतील यंत्रणेवर सुतराम विश्वास नसल्याने ‘चाणक्य’च्या नाट्यप्रयोगासाठी निर्मात्यांनी प्रकाश व ध्वनियोजनेची यंत्रणा बाहेरून भाड्याने आणली होती. हे सत्य उघडकीस आले आहे, असे कला राखण मांडने म्हटले आहे. तरीही कला अकादमीतील प्रकाश व ध्वनियंत्रणा निर्दोष होती, असा दावा करणारा जोशी यांचा व्हिडियो व्हायरल करण्यात आला.

कला अकादमीत २५ रोजी ‘चाणक्य’चा प्रयोग झाला होता, त्यानंतर लगेचच हा व्हिडियो प्रसारित करण्यात आला. याउलट, काही दिवसांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘पुरुष’ या नाटकावेळी प्रकाशयोजना बिघडल्याने नाट्यप्रयोग मध्ये थांबवावा लागला व साध्या फ्लडलाईट्स वापरून प्रयोग उरकावा लागला, असे सांगून कला अकादमीतील यंत्रणेवर टीका केली होती.

Goa Artists Demand Action Kala Academy
Kala Academy वादात अभिनेते मनोज जोशींच्या मुलाखतीमुळे खळबळ; 'चाणक्य'च्या प्रयोगानंतर नाट्यगृह व्यवस्थेचे केले कौतुक

या अक्षम्य प्रकारांवर पांघरूण घालण्यासाठी नंतर मंत्री गोविंद गावडे यांनी तो केवळ दोन मिनिटांचा तांत्रिक बिघाड होता असा दावा करून या सर्वांनी ‘सुपारी’ घेतली आहे, असा गंभीर आरोप पोंक्षेसहित सर्व कलाकारांवर केला होता.

Goa Artists Demand Action Kala Academy
Kala Academy: रंगमंचाचे छप्पर कोसळते, पावसाचे पाणी झिरपते, प्रकाशव्यवस्था- AC बंद पडतो; मग कलाकार 'सुपारीबाज' कसे काय?

तांत्रिक दोष येताहेत उघड्यावर!

नूतनीकरणाच्या नावाने कला अकादमी संकुलाचे बांधकाम आणि त्यातील प्रकाशयोजना व ध्वनियोजनेचे तीन तेरा वाजल्यानंतर आता हळूहळू हे तांत्रिक दोष उघड्यावर येऊ लागले आहेत व त्यामुळेच कधी मुख्य पडदा उघडत नाही, प्रवेश पडदा अर्ध्यावरच अडकतो, थोडासा पाऊस आल्यास नाट्यगृह गळू लागते, खराब ध्वनियंत्रणेमुळे मागच्या रांगांमध्ये ऐकायला येत नाही, प्रकाशयोजना विजेसारखी चमकू लागते व कधीकधी वातानुकूलन व्यवस्थाच बंद पडते या गोष्टीकडेही ‘कला राखण मंच’ने लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com