Nilesh Cabral on Solar System

 

Dainik Gomantak

गोवा

सरकारी इमारतींमध्ये सौरऊर्जेच्या वापराचा प्रस्ताव

वीजमंत्री नीलेश काब्राल यांची माहिती, शाळा, महाविद्यालयांचाही समावेश

दैनिक गोमन्तक

पणजी : विजेच्या वाढत्या मागणीमुळे सरकारने आता छतावर बसवण्यात येणाऱ्या सौरऊर्जा (Solar System) उपकरणांवर अधिकचा भर दिला आहे. पुढील काही वर्षांत राज्यातील सर्व सरकारी इमारती सौरऊर्जेवर चालवण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच यासाठी शाळा, महाविद्यालये सौरऊर्जेच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयोग केल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे. तसेच त्यातून वीज बचत होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप (BJP) कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वीजमंत्री काब्राल यांनी सरकारच्या नव्या सोलार धोरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार व भाजप नेते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.

‘रुफ सोलार एनर्जी’ माध्यमातून 22 मेगावॅट विजेची निर्मिती गोव्यात झाली आहे. येत्या काळात आणखी 10 मेगावॅट वीजनिर्मिती सौरऊर्जेच्या माध्यमातून होणार आहे. हायब्रीड तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोलार व बॅटरी सोलार हे प्रकल्प गोव्यामध्ये (Goa) सुरु होणार असल्याचंही काब्राल यांनी सांगितलं आहे.

मागील 10 वर्षांत भाजप सरकारने वीज क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ‘वन नेशन वन ग्रिड’मुळे राज्याला लाभ झाला आहे. यामुळे कुठल्याही राज्यातून वीज खरेदी करु शकतो. सरकारने राज्यात 32 नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवलेले आहेत. कॉँग्रेसने (Congress) बसवलेले ट्रान्स्फॉर्मर हे खराब झाले आहेत. भाजप सरकारने बसवलेले ट्रान्स्फॉर्मर हे चांगल्या दर्जाचे असून अनेक वर्षे सेवा देत आहेत.

राज्यातील विविध ठिकाणी वीज उपकेंद्रांचे निर्माण केले आहे, तर काही ठिकाणी उपकेंद्रांचे काम सुरु आहे. वीज निर्मितीच्या विविध उपक्रमांमुळे 42 टक्के वीज (Electricity) वाढ मागील 10 वर्षांत भाजप सरकारने केली आहे, असेही वीजमंत्री काब्राल यांनी सांगितले.

सध्या राज्यभरात विजेच्या भू-वाहिन्या टाकण्याचे काम जोरात सुरु आहे. येत्या काळात यामुळे वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. वीज खात्याने नवीन 500 स्मार्ट मीटरही खरेदी केले आहेत. ते चाचणीसाठी बसवण्यात आले आहेत. यशस्वी झाल्यावर आणखी स्मार्ट मीटर बसवले जाणार असल्याचे वीजमंत्री काब्राल म्हणाले.

राज्यात चार्जिंग पॉईंटची उभारणी

राज्यात सध्या विजेवर चालणार्‍या गाड्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी 45 चार्जिंग सेंटर तयार करण्यात आले आहेत. आणखी पाच चार्जिंग सेंटर बसवण्यात येणार आहेत. या चार्जचे शुल्क इतर राज्यांपेक्षा कमी आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 25 मिनिटांचा वेळ लागणार आहे. पुढील काही वर्षांत राज्यातील बहुतेक गाड्या या विजेवर चालतील, असा विश्‍वासही वीजमंत्री काब्राल यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT