तृणमूलच्या संदीप वझरकर यांना अटक

संदीप वझरकर यांनी भाजपला (BJP) सडून तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे.
Sandeep Vazarkar arrested

Sandeep Vazarkar arrested

Dainik Gomantak 

म्हापसा: सुकूरचे माजी सरपंच व विद्यमान पंच संदीप वझरकर यांना सेरुला कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणी म्हापसा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. संदीप वझरकर यांनी भाजपला (BJP) सडून तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे.

<div class="paragraphs"><p>Sandeep Vazarkar arrested</p></div>
सरकारला खनिज माल विकण्याची घाई झाली आहे: गोवा फाऊंडेशनचे क्लॉड अल्वारिस

सुकूर गावातील 7,975 चौरस मीटर जमीन संशयित वझरकर व त्यांच्या कुटुंबीयांनी फसवणूक करून मिळवली, असा त्यांच्यावर आरोप आहे. याबद्दल सेरूला कोमुनिदादचे अध्यक्ष अ‍ॅलेक्स डिसोझा व समितीच्या सदस्यांनी पोलिसांत (Police) तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी अर्जुन वझरकर, सुभाष वझरकर, सुवर्णा वझरकर, संदीप वझरकर, सीमा वझरकर, सरिता वझरकर, जयंत वझरकर, ज्योत्स्ना वझरकर, ऋषिकेश वझरकर, सुनिता वझरकर, गुरुदास नाईक आणि ए. सी. उर्फ आग्नेला लोबो यांच्याविरुद्ध गेल्या 2 जानेवारी 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. संदीप वझरकर (Sandeep Vazarkar) यांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com