vishwajit Rane on RTPCR

 

Dainik Gomantak

गोवा

गोव्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचे नवे निर्देश, विलगीकरणही होणार

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात परदेशातून दाखल होणाऱ्या सर्व प्रवाशांची आता कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तसे निर्देश दिले आहेत. याआधी गोव्यात येणाऱ्या फक्त 2 टक्के आंतरराष्ट्रीय प्रवाशांचीच कोरोना चाचणी केली जात होती. ज्या देशांमध्ये कोरोनाचा धोका सर्वात कमी होता. मात्र आता गोव्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची टेस्ट करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

प्रवाशांची रॅपिड (RTPCR) टेस्ट करण्यासाठीचे दरही राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहेत. या टेस्टसाठी प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला 1500 रुपये मोजावे लागतील. त्यापेक्षा जास्त रक्कम कोणालाही आकारता येणार नाही, असं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात (Goa) सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे, त्यामुळे साहजिकच राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या गोव्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र तरीही पर्यटन हंगाम सुरु असल्याने राज्य सरकार कोणतेही कडक निर्बंध (Restrictions) लावण्याच्या तयारीत नसल्याचं चित्र आहे. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT