Music festival in Goa | Rohan khaunte on Sunburn Festival Dainik Gomantak
गोवा

...म्हणून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला परवानगी देण्याची गरजच नाही: खंवटे

सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात विविध ठिकाणी संगीत महोत्सव आयोजन केले जातात.

दैनिक गोमन्तक

पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी 26 ते 31 डिसेंबरदरम्यान राज्य सरकार संगीत महोत्सव (इलेक्ट्रिक म्युझिक फेस्टिव्हल) आयोजित करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला परवानगी देण्याची गरजच नाही, असे स्पष्ट मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. (Goa government to arrange its own music festival at year-end)

सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात विविध ठिकाणी संगीत महोत्सव (ईडीएम म्युझिक फेस्टिव्हल) आयोजन केले जातात. यापूर्वी अशा प्रकारचे अनेक फेस्टिव्हल वादात सापडले असताना सनबर्न फेस्टिव्हल पुन्हा करण्याच्या उद्देशाने या कंपनीच्या वतीने तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले, पर्यटन खात्याकडे आतापर्यंत कोणीही अशा प्रकारची परवानगी घेण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे सातत्याने राज्य सरकारला कोणी गृहीत धरत असेल ते चूक आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, वर्षअखेरीला 26 ते 31 डिसेंबरदरम्यान पाच दिवस राज्य सरकारच्या वतीने अशा प्रकारचा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्या दृष्टीने पर्यटन खात्याला सूचना देण्यात आल्या आहेत.

जर राज्य सरकारचा संगीत महोत्सव झाला तर सनबर्नसारख्या कंपनीला राज्यात संगीत महोत्सव घेण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही आणि जर कुणाला अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करायचा असेल तर त्यासाठी रितसर पर्यटन खात्याची अगोदर परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र, राज्य सरकारला कोणीही गृहीत धरू नये, असेही खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT