गोव्यातील रस्त्यांची दुरवस्था; नागरिक चिंतेत

खराब रस्त्यांवरून प्रवास करणे धोक्याचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
Road
Road Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अटल सेतू पुलामुळे वाहतूक सुरळीत होईल, अशी प्रवाशांना आशा होती. मात्र सध्याचे चित्र यापेक्षा खूप वेगळे आहे. उद्घाटनानंतर काही दिवसांनी हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. (Roads in Goa are in bad condition, says commuters)

Road
मोरपिल्ला भागात डेंग्यूचे थैमान; चाळीसच्या घरात संशयितांची संख्या

दरम्यान, गोव्यातील बहुतेक रस्ते आणि उड्डाणपूल खराब स्थितीत आहेत. परिणामी येथे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. या रस्त्यांवरून प्रवास करणे धोक्याचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. लोकांच्या मते हे रस्ते संशोधन न करताच बांधण्यात आले आहेत. हे पूल बंद करून त्यांची देखील दुरुस्ती करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

Road
गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

सामाजिक कार्यकता संजय बर्डे यांच्या मते मोठ्या प्रकल्पांच्या निविदा अनेकदा गोव्याच्या बाहेरील कंत्राटदारांना दिल्या जातात, तर गोव्यातील लोकांना केवळ अंतर्गत गावांमध्ये रस्ते बांधण्यासाठी निविदा दिल्या जातात. पर्वरी ते पणजी असा रोज प्रवास करणारा एक प्रवासी म्हणाला, "करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होत आहे. सरकारने रस्त्यांकडे लक्ष दिले पाहिजे. अटल सेतू पूल तुलनेने नवीन असूनही, रस्त्याची अवस्था वाईट आहे. रस्ते इतके खराब आहेत की अपघात कधी होईल हे सांगता येत नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com