Margao: Dr.Sneha Bhagwat present at the press conference of South Goa Mahila Morcha activists. Ranjita Pai and many others Dainik Gomantak
गोवा

Goa: 'सरकारी योजना महिलांपर्यंत पोचविणार'

महिला मोर्चाचा निर्धार

दैनिक गोमन्तक

सासष्टी: राज्य व केंद्र सरकारने महिलांसाठी ज्या योजना व उपक्रम सुरू केले आहेत, ते महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी दक्षिण गोवा महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी निर्धार केल्याचे डॉ. स्नेहा भागवत यांनी सांगितले. त्यासाठी महिला मोर्चातर्फे जागृती केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. बुधवारी या पत्रकार परिषदेला तनुजा पैंगीणकर, मधुकला शिरोडकर, शैला पार्सेकर, बबिता बोरकर उपस्थित होत्या.

दक्षिण गोवा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे अभिनंदन करण्यात आले. गोव्यातील निवडणुकीत मिळवलेले यश, सरकारची स्थापना व नंतर विधानसभेत सादर केलेला लोकाभिमुख अर्थसंकल्प यासाठी हे अभिनंदन असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.

तीन गॅस सिलिंडर मोफत, मडगावात एफसीसीआयची कचेरी सुरू करणे, स्टार्टअपमध्ये महिलांसाठी सवलती, महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम सर्व योजनांचा लाभ महिलांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहिता साळगावकर, भारती नाईक यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT