Goa Government | Rohan Khaunte
Goa Government | Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: पुढच्या वर्षापासून नवीन शॅक धोरण आणणार- रोहन खंवटे

दैनिक गोमन्तक

Goa Government: पुढच्या वर्षी 2023 मध्ये पर्यटन खाते नवीन शॅक धोरण आणणार आहे. 2019 साली सुरू करण्‍यात आलेली किनाऱ्यांवरील शॅक, डेक बेड, छत्र्या, झोपड्या आणि इतर संरचना या धोरणाचा तीन वर्षांचा कालावधी या वर्षी संपुष्टात येणार होती. परंतु कोरोना महामारीमुळे झालेला परिणाम लक्षात घेऊन सरकारने यावर्षी ऑगस्टमध्ये एक वर्षाची मुदत दिली आहे.

2019 च्या धोरणानुसार 33 समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 364 शॅक उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली. यात उत्तर गोव्यात 259 तर दक्षिण गोव्यात 105 शॅक आहेत. यापैकी ३३ जणांना मागील हंगामातील शुल्क न भरल्यामुळे या वेळी शॅकवाटप करण्यात आलेले नाही, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. पर्वरीतील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, डेक बेड शुल्कात कपात करावी, 10 हजार रुपये असलेले कचराशुल्क माफ करावे आणि परवाना शुल्क देखील कमी करावे, अशा मागण्या घेऊन शॅकमालक खंवटे यांना भेटले होते. डेक बेड शुल्क कमी केले जाईल, तर इतर शुल्क कमी करण्याचा विचार सध्या पर्यटन खात्याकडून सुरू आहे.

सरकारने शॅकमालकांद्वारे भरावे लागणारे डेक बेड शुल्क हे 10 हजार रुपयांवरून थेट 25 हजार रुपय केले होते. त्यात आता कपात करण्यासाठी मंत्री खंवटे यांनी तयारी दाखवली असून ते 15 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा आणि इतर शुल्कात कपात करण्याचा सरकार विचार सुरू आहे. यासंदर्भात निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

शुल्क भरण्‍यासाठी 4 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

शुल्क कमी केले जाईल असे सरकारने आश्‍वासन दिले आहे. परंतु शुल्क भरण्यासाठी दिलेली 3 ऑक्टोबरची मुदत शॅलमालकांनी चुकविली होती. आता शुल्क भरण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून शॅकमालकांनी शुल्क भरण्यास सुरूवात करावी, अशी सूचना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT