Goa Accident Cases: सांगेत अरुंद रस्त्यांमुळे अपघात

Goa Accident Cases: ग्रामीण भाग असल्याने अरुंद रस्ता, वळणे, झाडेझुडपे वाढल्याने नेहमीच अपघात होत असतात.
Goa Accident Cases | Damage Road
Goa Accident Cases | Damage RoadDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Cases: सांगेत अपघातप्रवण अनेक ठिकाणे आहेत. ग्रामीण भाग असल्याने अरुंद रस्ता, वळणे, झाडेझुडपे वाढल्याने नेहमीच अपघात होत आहेत. बऱ्याच ठिकाणी जमीन खाजगी मालकांची असते किंवा वन खात्याची त्यामुळे जमिनीचे दावे निकाली लागेपर्यंत अनेकदा अपघातात होत असतात.

दरम्यान, त्वरित वळणे कापणे, रस्ते दुरुस्ती करणे गरजेचे असून खड्डेमय रस्ता दुरुस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आठवड्यापूर्वीच सांगेत अपघातात बळी एक गेला, तो वळणामुळे, असे अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज लागत नसल्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत असताना अपघात होतो.

Goa Accident Cases | Damage Road
Goa News: खड्डे बुजविण्याच्या 'ॲप'ला आता पुढच्या वर्षीचा मुहूर्त!

प्रत्येक वळणाची सार्वजनिक बांधकाम खात्याने पाहणी करून धोकादायक वळणे कापण्याची आवश्यकता झाली आहे. दांडो-सांगे येथील पेट्रोल पंप नजीक असलेल्या वळणावर कित्येकदा लहान मोठे अपघातात घडलेले आहे. त्यात पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या वाहन चालकात वळण असल्याने समोरून येणारे वाहन कोणत्या दिशेने जाणार यांचा अंदाज न लागल्याने अपघातात घडलेले आहे.

बळीसुद्धा गेले आहे. हे वळण कापून काढणे गरजेचे आहे. वळण कापण्यास येणाऱ्या अडचणी दूर होईपर्यंत झाडेझुडपे वाढतात, याची सार्वजनिक बांधकाम खात्याने खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

भाटीत वळणामुळे अपघात

भाटी पंचायत क्षेत्रात सुद्धा अनेकदा वळणामुळे अपघातात घडलेले आहे. विलीयण येथे वळणा-वळणाचा रस्ता वाहतुकीस धोकादायक आहे. पुढे व्हालसे येथेही श्री नागनाथ मंदिराच्या समोर असलेल्या वळणामुळे अपघातात घडलेले आहे.

त्या पुढील नेत्रावळीपर्यंतचा भाग वनक्षेत्र असल्याने वळणे आणि बारमाही झुडपे वाढलेली असतात. केवळ चतुर्थी किंवा दिवाळीच्या सणाला झुडपे कापली जातात. त्यानंतर वर्षभर कोणी पाहत नाही.

Goa Accident Cases | Damage Road
Goa Government: गोव्यात अमली पदार्थांविरोधात मोहिमेवर केंद्रीय गृहमंत्री समाधानी

मोकाट जनावरांची समस्या

बऱ्याचदा अपघाताला कारणीभूत एक तर वळणे असतात किंवा मोकाट जनावरे असतात. अशा वळणावर रात्रीच्या वेळी अचानक जंगली जनावरे खास करून गवे रेडे, हरीण, रान डुक्कर सारखी जंगली जनावरे रस्त्यावर आडवी येत असल्याने अपघातात घडलेले आहे.या वर उपाय योजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

दयानंद नाडकर्णी, अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते-

सांगेतील धोकादायक वळणाची पाहणी यापूर्वी आपण केलेली असून अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. रस्त्यालगत असलेल्या झुडपांची छाटणी लवकरच करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com