Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Carlos Ferreira: 'त्या' संरक्षित जमिनींवर उभारल्या लोकवस्‍त्या! सरकारकडूनच होतंय कायद्याचे उल्लंघन

कार्लुस फेरेरा : जमिनी संरक्षित ठेवणे गरजेचे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session राज्य सरकारच्या कायद्यानुसार जलसंपदा क्षेत्र विकास योजनेअंतर्गच्या (काडा) जमिनी या शेती, बागायती वगळता इतर कामांसाठी वापरता येत नाहीत. आपल्याच कायद्याचे सरकारने आजवर पालन केलेले नाही.

अशा जमिनींवर लोकवस्त्या उभ्या राहिल्या असल्याकडे आमदार कार्लुस फेरेरा यांनी लक्ष वेधले. जलसंपदा व सहकार खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी हा मुद्दा मांडला.

फेरेरा म्हणाले की, काडा योजनेअंतर्गतील जमिनी संरक्षित ठेवल्या पाहिजेत. १९९७ मध्ये हा कायदा लागू झाला तरी त्याची अंमलबजावणी करणे टाळले गेले आहे. अशा जमिनी अधिसूचित कराव्या लागतात.

एकदा ती जमीन काडा जमीन म्हणून अधिसूचित केल्यावर ती विकासकामांसाठी देता येत नाही. जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर चांगले काम करत आहेत. त्याविषयी तक्रार नाही, पण त्यांनी काडा योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले पाहिजे.

‘साळावली’ची विनावापर जमीन परत करा

1. साळावली प्रकल्पासाठी संपादित पण विनावापर जमीन अल्पभूधारक शेतकऱ्यांना परत करावी अशी मागणी आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी केली. ते म्हणाले, या जमिनीपैकी काही जमीन महामार्गासाठी वापरण्यात आली. काही ठिकाणी अशी संपादित जमीन शिल्लक आहे. ती सरकारने परत करण्यासाठी प्रयत्न करावेत.

2. सरकारने मानशीचे दरवाजे लावण्यासाठी अनुदान द्यावे, किंबहुना खात्यानेच ते काम करावे. व्हिजनरी सहकारी पतसंस्थेत ग्राहकांचे पैसे अडकले आहेत. किमान पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्याची व्यवस्था केली जावी, असेही ते म्‍हणाले.

बांधाअभावी मयडेतील शेती पडीक

जलसंपदा खात्याचे कालवे गळत आहेत. ते पाणी शेतात भरून राहिल्याने शेती करता येत नाही. शेतीही पाण्याखाली जाते. बांध बंदिस्तीच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले गेले पाहिजे. मयडे येथील बांध दुरुस्त न झाल्याने शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे.

पनोळे येथील बांध दुरुस्तीसाठी वित्तीय मंजुरी हवी यात लक्ष घालावे. कोळंबवाड्यावरील शेततळीतील गाळ उपसला पाहिजे. पोंबुर्फा बांधाचे काम हाती घ्यावे. भूजल संवर्धनासाठी गाव पातळीवर उपाय हाती घ्यावेत, अशी मागणी हळदोण्‍याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: बड्या नेत्याचा साधेपणा की राजकीय स्टंट? खासदारसाहेब बनले 'डिलिव्हरी बॉय', ब्लिंकिटचा युनिफॉर्म घालून घरोघरी पोहोचवलं पार्सल

शेतीची जमीन अन् क्लबचा धंदा; हणजूण येथील 'त्या' क्लबला प्रशासनाचा दणका, ठोठावला 15 लाखांचा दंड

Goa Winter Session: विधानसभेत एक मिनिटाचे मौन! शिरगाव आणि हडफडे दुर्गटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली

Goa Crime: मुंगुल गँग वॉरचा आरोपी आता 'पोक्सो'च्या कचाट्यात! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी कुख्यात अमर कुलालच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT