Ravi Kishan Demands Gorakhpur To Goa Flight: भाजपचे खासदार, भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी गोरखपूर ते गोवा थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. किशन यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी ही मागणी केली. रवी किशन शुक्ला हे गोरखपूरचे खासदार आहेत.
रवी किशन यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी हवाई उड्डाणांशी संबंधित अनेक समस्याही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्या.
खासदार रवी किशन ज्योतिरादित्य शिंदे यांना म्हणाले की, गोरखपूर विमानतळ केवळ उत्तर प्रदेशलाच नाही तर नेपाळ आणि बिहारमधील प्रवाशांनाही सुविधा पुरवतो. येथे मोठ्या संख्येने प्रवासी येत असतात. गेल्या काही वर्षांत येथे प्रवाशांची संख्या वाढली आहे.
सध्या वेगवेगळ्या ठिकाणी 10 उड्डाणे सुरू आहेत. दिल्ली, लखनौ, हैदराबादसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची उड्डाणे अनेकदा रद्द होतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गोरखपूर ते दिल्ली दररोज सकाळ आणि संध्याकाळची विमानसेवा नियमित करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्पाइसजेटचे उड्डाण रद्द झाल्यास, गोरखपूर ते मुंबई, गोरखपूर ते अहमदाबाद, गोरखपूर ते इंदूर आणि ग्वाल्हेर थेट विमानसेवा आवश्यक आहे.
एअर इंडिया, विस्तारा, एअर एशिया या विमान कंपन्यांनीही गोरखपूरहून विमानसेवा सुरू करावी, असे ते म्हणाले.
गोरखपूरहून पुणे, इंदूर, जयपूर आणि गोव्यासाठी थेट उड्डाणे सुरू करावीत आणि गोरखपूर ते प्रयागराज दरम्यान पुन्हा आरसीएम इंडिगोची विमानसेवा सुरू करावी, अशी मागणीही खासदार रवी किशन यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.