Goa Tourism
Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोवा सरकारचा मोठा प्लॅन, केंद्राच्या आर्थिक पाठबळाशिवाय साकारणार महत्वाचा प्रकल्प

Pramod Yadav

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे अंग आहे. राज्यातील पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार नेहमीच विविध गोष्टी करत असते. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार एका मोठ्या प्रोजेक्टवरती काम करत आहे.

विशेष म्हणजे या कामासाठी गोवा सरकार केंद्राच्या आर्थिक पाठबळाशिवाय राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या आधारेच ही गोष्ट साकारणार आहे.

काय आहे प्लॅन?

पर्यटनवाढीसाठी आणि राज्यातील पर्यटनाची आणि सांस्कृतिक स्थळांची एकत्र माहिती मिळावी यासाठी ही योजना आहे. गोवा सरकार येत्या काळात पंतप्रधान गती शक्ती (PM Gati Shakti) या राष्ट्रीय स्तरावरील पोर्टलच्या आधारे गोव्याचा नवा नकाशा तयार करणार आहे. हा गोव्याचा सांस्कृतिक नकाशा असेल.

या नकाशात राज्यातील विविध महोत्सव (Festivals), विविध कार्यक्रम, विविध ठिकाणी जाण्यासाठी आकारलं जाणारं प्रवेश शुल्क इत्यादींची माहिती दिली जाणार आहे.

ज्यामध्ये सर्वसाधारण नकाशासोबतच राज्यात येणाऱ्या स्थानिक आणि परदेशी प्रवाशांसंदर्भातील माहितीसुद्धा देण्यात येणार आहे. केंद्राच्या आर्थिक पाठबळाशिवाय राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या आधारे या गोष्टी साकारल्या जाणार आहेत. GIS Map वर ही माहिती उपलब्ध असेल.

राज्याच्या सांस्कृतिक नकाशा तयार करण्यासाठी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि पर्यटन विभाग एकत्र या संकल्पनेवर काम करणार आहे. ज्यामध्ये धार्मिक स्थळांपासून संग्रहालयांपर्यंतची माहिती उपलब्ध होईल. राज्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देणारे पर्यटक, त्यांची संख्या, पर्यटनस्थळी असणाऱ्या सुविधा या साऱ्याच्या आधारे माहिती एकत्रित करून नकाशा निर्माण केला जाणार आहे.

मोठा समुद्र किनारा लाभलेल्या गोव्याची संस्कृती येथील शांतता अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते. अशात हा नकाशा तयार झाल्यास त्याची अनेकांना मदत होईल व पर्यटनात देखील वाढ होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: लाच, खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT