Goa government tribute Vajpayee Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारकडून भारतरत्न वाजपेयींना अनोखी श्रद्धांजली; नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचे नामकरण केले 'अटल'

Goa new district news: नव्या जिल्ह्यात सावर्डे, सांगे, केपे, कुडचडे आणि काणकोण या तालुक्यांचा समावेश होईल, अशी माहिती सभापती गणेश गावकर यांनी दिली.

Pramod Yadav

पणजी: होणार... होणार अशी चर्चा असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 'अटल' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार आहे.

दिवंगत मंत्री रवी नाईक यांनी तिसऱ्या जिल्ह्याची संकल्पना मांडली होती. त्यांना फाँडा येथे मुख्यालय ठेवून तिसरा जिल्हा आकाराला आणायचा होता. आता सरकारने सर्वपक्षीय बैठकीत तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीला अंतिम रूप दिले आहे. मात्र त्यात फॉडा तालुका नसेल.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार या तिसऱ्या जिल्ह्यात धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण तालुक्यांचा समावेश असेल. प्रशासनाचे विकेंद्रीकरण व जनतेला जलद सेवा देण्यासाठी हा तिसरा जिल्हा उपयोगी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचे चंद्रपूर असे नामकरण केले जाण्याची शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. तसेच, या जिल्ह्याचे मुख्यालय कुडचडे येथे उभारले जाऊ शकते, अशीही चर्चा होती. दरम्यान, या दोन्ही शक्यता आता समाप्त झाल्या आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मात्र तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी घाई केल्याचे म्हटले आहे. "तिसऱ्या जिल्हयाला काँग्रेसचा विरोध नाही परंतु योग्य अभ्यास करून निर्णय व्हायला हवा. याबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सरकारने उघड करावा", असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT