Calangute Crime News: कळंगुट पोलिसांना फोन आला अन्... कारचे दार उघडताच बसला मोठा धक्का; 41 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Calangute death case: कळंगुट येथील फुटबॉल मैदानाजवळ उभ्या असलेल्या एका स्विफ्ट कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
41 year old man found dead inside car in Calangute
41-year-old man found dead inside car in Calangute GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कळंगुट येथील फुटबॉल मैदानाजवळ उभ्या असलेल्या एका स्विफ्ट कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख षण्मुखा शिवपुत्रा भाविमणी (वय ४१, रायचूर जिल्हा, कर्नाटक) अशी पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजी पीसीआरला एका नागरिकाचा फोन आला होता. कळंगुट फुटबॉल मैदानावर उभ्या असलेल्या स्विफ्ट कारच्या मागील सीटवर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती या फोनवरून देण्यात आली होती. माहिती मिळताच कळंगुट पोलिस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे पाहणी केली असता कारच्या मागील सीटवर संबंधित व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली.

41 year old man found dead inside car in Calangute
Goa Politics: 'आरजी'कडून निमंत्रणाचे स्वागत, निवडणूक आघाडीसाठी 'काँग्रेस'कडून चर्चेचा प्रस्ताव

पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. प्राथमिक तपासात मृतदेहावर कोणत्याही दुखापतीच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात पाठविण्यात आला.

41 year old man found dead inside car in Calangute
Goa Politics: नव्‍या राजकीय खेळीस सुरवात, सरदेसाई-पाटकर एकत्र; तिसऱ्या आघाडीची शक्‍यता

मित्रांसोबत आले होते गोव्यात

दरम्यान, मृत षण्मुखा हे त्यांच्या दोन मित्रांसोबत गोव्यात आले होते. “मी दोन दिवस राहून परत येतो,” असे सांगून ते मित्रांपासून वेगळे झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर थेट कारमध्येच त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com