VIDEO: भरधाव वेग अन् अचानक नियंत्रण सुटलं! गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाच्या कार अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; 6 दिवसांनंतर भयानक वास्तव आलं समोर

Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Video: गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा अबान अहमद याच्या कार अपघाताचा एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला.
Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Video
Atiq Ahmed Son Aban Ahmed AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Video: गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा अबान अहमद याच्या कार अपघाताचा एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला. 6 ऑगस्ट रोजी झाशी येथे झालेल्या या भीषण कार अपघातात अबान आणि त्याचा मित्र सोनू या दोघांचा मृत्यू झाला. या थरारक अपघातानंतर तब्बल 6 दिवसांनी आज त्या कारमधील डॅशबोर्ड कॅमेऱ्याचे फुटेज समोर आले असून, सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अबान चालवत असलेली वेगवान एसयूव्ही कार झाशी जिल्ह्यातील हायवेवर अचानक नियंत्रण सुटल्याने डिवाइडरला धडकून उलटल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या या व्हिडिओनुसार, अबानच्या भरधाव कारने सुरुवातीला एका कारला ओव्हरटेक केले आणि त्यानंतर पुढे जात असलेल्या एका ट्रकलाही ओव्हरटेक करुन कार पुढे निघाली. मात्र, ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर अचानक कार डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली उतरली. यामुळे कारचा समतोल बिघडला आणि ती थेट हायवेच्या डिव्हायडर जाऊन जोरदार धडकली.

Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Video
Zimbabwe Boat Accident: जिम्बाब्वेमध्ये काळाचा घाला! 95 प्रवाशांनी भरलेली बोट सरोवरात उलटली, 15 जणांचा मृत्यू; 20 हून अधिक बेपत्ता VIDEO

धडक इतकी भीषण होती की, कार हवेत उडाली आणि रस्त्यावरच उलट्या खात कोसळली. या भीषण अपघातात (Accident) कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. हा भीषण अपघात 6 ऑगस्ट रोजी झाशीच्या पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायवेवर झाला होता. अबान अहमद हा प्रयागराजहून झाशीकडे जात होता. झाशीच्या जेलमध्ये बंद असलेला त्याचा मोठा भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी तो निघाला होता, मात्र वाटेतच काळाने त्याच्यावर झडप घातली.

Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Video
Bus Accident: नियंत्रण सुटलं अन् प्रवाशांनी भरलेली बस थेट... भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी Watch Video

दरम्यान, या अपघातानंतर प्रयागराज येथे झालेल्या अबानच्या अंत्यविधीसाठी जेलमध्ये बंद असलेल्या उमर अहमद आणि अली अहमद या त्याच्या दोन्ही मोठ्या भावांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने पॅरोल मंजूर केला. कडक पोलीस बंदोबस्तात थेट दफनभूमीवर आणले गेलेले दोन्ही भाऊ आपल्या लहान भावाच्या अंत्यविधीवेळी प्रचंड भावुक झाले. अबानला त्याचे वडील अतिक अहमद याच्या कबरीजवळच दफन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com