Candolim Illegal Project: शेतात सांडपाणी अन् खारफुटीची कत्तल! कांदोळीतील बेकायदा प्रकल्पांचा मुद्दा चर्चेत; मुख्‍यमंत्र्यांकडे तक्रार

Candolim villagers allegations: कांदोळी पंचायत क्षेत्रात नियम व कायद्यांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर बेकायदा प्रकल्प सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ ग्लेन फर्नांडिस व डेरिक गोन्साल्‍विस यांनी केला आहे.
Candolim villagers allegations
Candolim illegal project sewage and mangrove destruction complaint in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कांदोळी पंचायत क्षेत्रात नियम व कायद्यांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर बेकायदा प्रकल्प सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ ग्लेन फर्नांडिस व डेरिक गोन्साल्‍विस यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून प्रस्तावित नेरुल बांध प्रकल्पाच्या उद्‌घाटनानंतर कांदोळीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निमंत्रण दिले आहे.

पत्रात स्थानिक पंच व अधिकाऱ्यांच्या संगनमताने विविध बेकायदा कामे सुरू असल्याचा आरोप करत वीरा-सायपे, बामणवाडो, हिरो होंडा-दांडो, सनपार्क-सोझा वाडो, तलवार इम्पेक्स यांसारख्या प्रकल्पांना मंजुरी व ‘कॅरिंग कॅपॅसिटी’ मूल्यांकनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सिकेरी येथील ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये नियमांचे उल्लंघन करून बंगल्याला ओक्युपन्सी प्रमाणपत्र दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.

Candolim villagers allegations
Goa FDA Action: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; बेळगावातील पुरवठादाराकडून 120 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करुन केली नष्ट

बामणवाडो येथील केशवा प्रकल्पाजवळ सांडपाणी शेतात सोडले जात असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच नेरुल बांध प्रकल्पामुळे खारफुटीचे नुकसान होऊन खेकडे व शिंपले पकडून उपजीविका करणाऱ्या मच्छीमारांवर परिणाम होत असल्याचे पत्रात नमूद आहे. बांधाजवळील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व बांधकामांवरही आक्षेप घेण्यात आला आहे.

Candolim villagers allegations
Calangute Crime News: कळंगुट पोलिसांना फोन आला अन्... कारचे दार उघडताच बसला मोठा धक्का; 41 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

पार्किंग शुल्क वसुली व कचरा व्यवस्थापनाची कंत्राटे ई-टेंडरिंग न करता देण्यात आल्याचा, तसेच पंचायतीच्या जागेतील कार्यालयीन जागा आमदार मायकल लोबो यांना देऊन तिचा रिअल इस्टेटसाठी वापर होत असल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख तक्रारी

विविध प्रकल्पांच्या मंजुरी व ‘कॅरिंग कॅपॅसिटी’वर प्रश्न, ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये नियमभंगाचा आरोप, सांडपाणी शेतात सोडल्याने शेतीचे नुकसान, नेरुल बांधामुळे खारफुटी व मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम, सीआरझेडमधील बांधकामे व नाईट क्लबवर आक्षेप, पंचायत निविदा व कंत्राट प्रक्रियेत नियमभंगाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याची मागणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com