P. S. Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

P S Sreedharan Pillai: गोवा सर्वधर्म जोपासणारे राज्य

P S Sreedharan Pillai: मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघाचा दौरा

दैनिक गोमन्तक

P S Sreedharan Pillai: गोवा हे सर्वधर्म समभाव जोपासणारे आणि घटनेच्या ४४ व्या कलमाची अंमलबजावणी करणारे देशातील एकमेव राज्य आहे, असे गौरवोद्‌गार राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले.

साखळी मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी साखळी येथील रवींद्र भवनात सरपंच, पंच आणि जनतेशी संवाद साधताना राज्यपाल बोलत होते. साखळीच्या दाैऱ्याने राज्यपालांच्या ‘गोवा संपूर्ण यात्रे’ची सांगता झाली.

साखळीतील रवींद्र भवनात झालेल्या या बैठकीवेळी साखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, महेश सावंत, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल पिल्लई यांचे रवींद्र भवनाजवळ आगमन होताच महिला कार्यकर्त्यांनी ओवाळणी आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. राज्यपालांच्या पत्नी के. रिटा यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी समई नृत्य आणि फुगडी सादर करण्यात आली. राज्यपालांनी लोकनृत्याचा आस्वाद घेतला.

आर्थिक मदतीचे वाटप

या बैठकीत विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांचा राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डायलिसिस आणि कर्करोग ग्रस्तांना मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

धार्मिक स्थळांना भेट

कुडणे पंचायतीला दिलेल्या भेटीने राज्यपाल पिल्लई यांच्या दौऱ्याला सुरवात झाली. तीर्थक्षेत्र असलेल्या हरवळे येथील रुद्रेश्वर मंदिराला राज्यपालांनी भेट दिली. रुद्रेश्वर देवाचे दर्शन घेऊन श्रीचरणी आपली सेवा अर्पण केली.

डायनॅमिक मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे ‘डायनामिक’ तेवढेच दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करीत असून, गोव्याची प्रगती ठरलेली आहे, असे गौरवोद्‌गारही राज्यपाल पिल्लई यांनी काढले.

राज्यपालांकडून इतिहास

राज्यपाल पिल्लई यांनी गोव्यातील सर्व मतदारसंघांचा दौरा करून जनतेशी संवाद साधला आहे. हा एक इतिहास आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT