Illegal Construction  Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction : अवैध बांधकामांवर कारवाई; सरकारचा आदेश

कोमुनिदाद प्रशासकांकडून 36 जणांना नोटिसा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Illegal Construction : राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या शेजारी असलेल्या सखल भागात बेकायदेशीरपणे मातीचा भराव टाकून जमीन बुजविणे तसेच अवैध बांधकामांविरुद्ध कारवाईचा आदेश नुकताच सरकारने काढला होता.

त्यानुसार, संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदारांकडून तातडीने कारवाईची मोहीम राबविली होती. याच पार्श्वभूमीवर या विशेष मोहिमेअंतर्गत बार्देश तालुक्यातील 36 जणांना कोमुनिदाद उत्तर क्षेत्र प्रशासकांनी कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.

महामार्गालगत जागेत बेकायदेशीरपणे मातीचे भराव टाकून कोमुनिदाद मालकीची जमीन बुजविणाऱ्यांस किंवा तिथे बांधकाम केलेल्या तब्बल 36 उल्लंघनकर्त्यांना या नोटिसा पाठविल्या असून यासंदर्भात सोमवार, 20 मार्च रोजी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

अवैध बांधकाम किंवा मातीचा भराव टाकल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध ४८ तासांत कारवाई करावी आणि यापुढे रस्त्यालगत बेकायदा बांधकामे उभी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे या आदेशात सरकारने म्हटले होते.

त्यानंतर बार्देश उपजिल्हाधिकारी व मामलेदारांकडून तालुक्यातील विविध सकल भागांची तसेच महामार्गलगत बांधकामांची पाहणी केली होती. तेव्हा अनेकांनी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कोमुनिदाद जमिनीत मातीचा भराव टाकून जमीन बुजविल्याचे निर्दशनास आले होते.

20 रोजी सुनावणी

पाहणीनंतर मामलेदारांनी अहवाल बनवून या उल्लंघनकर्त्यांवर कारवाई करण्याबाबत कोमुनिदाद उत्तर क्षेत्राच्या प्रशासकांना सूचना केली. यानुसार कोमुनिदाद प्रशासकांनी संबंधितांना नोटीस बजावून सोमवार, 20 रोजी सकाळी 10.30 वा. आवश्यक कागदपत्रे घेऊन कार्यालयात सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या भागातील उल्लंघनाची प्रकरणे

बस्तोडा 2

नास्नोळा 20

सुकूर 5

रेवोडा 1

म्हापसा 3

साळगाव 1

गिरी 2

उसकई 1

साल्वादोर दु मुंद 1

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT