Pramesh Mayekar Dainik Gomantak
गोवा

Goa: सरकारने लोकशाहीचा अक्षरशः खून केलाय- प्रमेश मयेकर

सरकारने (Government) आता स्थानिक पंचायतीने जे आपले आराखडे सादर केले ते स्वीकारावे अशी मागणी प्रमेश मयेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी पणजी (Panajim) येथे जनसुनावणी गुरुवारी ८ जुलै रोजी झाली, त्यावेळी सरकारने लोकशाहीचा अक्षरशः खून करण्यात आला आहे. असा दावा मांद्रे गट कॉंग्रेस उपाध्यक्ष प्रमेश मयेकर (Pramesh Mayekar) यांनी केला आहे सरकारने आता स्थानिक पंचायतीने जे आपले आराखडे सादर केले ते स्वीकारावे अशी मागणी प्रमेश मयेकर यांनी केली आहे.

सरकारची जनसुनावणी फक्त फक्त नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी होती नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले नाही. नागरिकांना विश्वासात न घेता कोणीतरी बाहेरच्यांनी वातानुकुलीत कार्याकायात किंवा तारांकित हॉटेलात बसून डोळे झाकून आराखडा बनविला आहे.असा दावा प्रमेश मयेकर यांनी केला.

हा आराखडा स्थानिक लोकांना आणि ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने तयार करणे गरजेचे आहे , स्थानिकांची घरे , झोपड्या यांचा उल्लेख नकाशा असणे बंधनकारक आहे या जनसुनावणी वेळी खाजन जमिनी, बांध, मानस, भरती रेषा, भरती रेषे पासून आखण्यात आलेल्या 100 मीटर व 200 मीटरची रेषा, मच्छीमारी क्षेत्र यावर विषय मांडता येतील असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात जनसुनावणी आलेल्या वक्त्या नागरिकांना कोणत्याच प्रकारची योग्य उत्तरे देण्यात आली नाही. सर्त्काराने चालवलेली हि हुकुमशाही बंद करून स्थानिकाना न्याय द्यावा अशी मागणी मयेकर यांनी केली आहे.

अंतिम आराखड्याच्या वेळी गोमंतकीय यांनी अधिक जागृत व संघटित व्हायला पाहिजे. आता ही कामगिरी मांद्रे मतदार संघातून कॉंग्रेस पक्ष करणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले मातृभूमीच्या रक्षणार्थ आता सर्वांनी संघटीत होवून काम करावे लागेल , त्यासाठी गावागावात जावून जागृती केली जाईल.

किनारी भागातील आमदारांनी आवाज उठवावा

मांद्रे कॉंग्रेस नेते प्रमेश मयेकर यांनी बोलताना किनारी भागातील आमदारांनी या विषयी आवाज उठवून स्थानिक किनारी भागातील मच्छिमार इतर व्यवसायाला दिलासा मिळायला हवा त्यासाठी आमदारांनी स्थानिकासोबत राहावे अशी मागणी मयेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT