Goa: आप आणि बाबाशान यांच्या कार्यकर्त्यांत नुव्यात धुमशान !

आपच्या कार्यकर्त्यांवर बाबशान डीसा (Babashan Deesa) यांच्या समर्थकांनी अंडी आणि टोमॅटो फेकून मारल्याने शेवटी पोलिसांना (Police) मध्यस्थी करून आप कार्यकर्त्यांना बाहेर काढावे लागले.
Nuwe
NuweDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात (BJP) गेलेल्या 10 आमदारांना आज दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्या द्विवर्षं पूर्तीच्या निमित्ताने त्या आमदारांना केक देण्यास गेलेल्या आप कार्यकर्त्यांना नुवेचे आमदार बाबाशान डीसा (Babashan Deesa) यांच्या कार्यकर्त्यानी अडविल्याने धुमशान माजले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांवर डीसा यांच्या समर्थकांनी अंडी आणि टोमॅटो फेकून मारल्याने शेवटी पोलिसांना (Police) मध्यस्थी करून आप कार्यकर्त्यांना बाहेर काढावे लागले.

आपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो (Pratima Coutinho) यांच्या नेतृत्वाखाली आपचे कार्यकर्ते केक देण्यासाठी डीसा यांच्या घरी गेले होते. त्यावेळी तुम्ही नावेलीच्या त्यामुळे आमच्या आमदारांना केक देण्यास तुम्हाला काय गरज असे म्हणत त्यांना अडविण्यात आले. त्यावेळी कुतीन्हो यांनी आपचे स्थानिक निमंत्रकाना बोलावून केक देण्यास सांगितले असता, आमच्या आमदाराचे आम्ही पाहून घेऊ तुम्हाला ते काय पडले आहेत असे म्हणत डीसा यांचे कार्यकर्ते आप कार्यकर्त्यावर तुटून पडले. त्यात कुतिन्हो याना धक्काबुक्कीही झाली.

Nuwe
Goa: लॅब उभारण्याची घोषणा हवेतच, चोडणकरांचा आंदोलनाचा ईशारा, तर ‘आप’कडून मागणी

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, बाबाशान समर्थकांची ही निव्वळ गुंडगिरी असा आरोप केला तर बाबाशान यांच्या पत्नी फ्रिडा यांनी आपचे कार्यकर्ते मुद्दाम लोकांना भडकावून घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतदारसंघाचा विकास व्हावा या एकमेव उद्देशाने आपले पती भाजपात गेले असून त्यामुळे मतदारसंघाचा विकास भरपूर झाला. त्यामुळे मतदारही समाधानी असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com