पर्ये: गोव्यात (Goa) येण्यासाठी अनमोड घाट (Anmod Ghat) अवजड व अतिअवजड वाहनांसाठी बंद केल्याने चोर्ला घाटातून (chorla ghat) वाहतूक वाढली आहे व त्याचा परिणाम केरी सत्तरी (Keri Sattari) चेक नाक्यावर पोलिस (check post) परराज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. गोव्यात प्रवेशासाठी covid negative अहवाल आवश्यक असल्याने केरी चेक नाक्यावर covid तपासणीसाठी गर्दी उसळली आहे त्यामुळे त्याचा ताण आता केरीतील यंत्रणेवर येत आहे.
गोव्यात अनमोड घाटातून येत असलेल्या प्रवासी बसेस आता चोर्ला घाटातून यायला सुरुवात झाल्याने केरी चेक नाका व घाटात वाहनांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळते. तसेच आज शनिवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या मार्गाने गोव्यात येत असून त्यामुळे ही गर्दी उसळली आहे.
एका बाजूने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यात प्रवेशासाठी कॉविशील्डच्या दोन्ही लसी घेतलेल्याना प्रवेश द्यावा अशी वक्तव्य केले गेले. पण चेक नाक्यावर असा कोणताही आदेश नसल्याने येथे मात्र कडक तपासणी होते. गोव्यात येणारे बहुतेक जणांकडे covid चे negative अहवाल नाही. अशांना या ठिकाणी अहवाल काढण्यासाठी बराच वेळ टकळत राहावे लागते त्यामुळे ही गर्दी निर्माण झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.