Goa Government Jobs Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: घरबसल्या येईल सरकारी नोकरीचा कॉल; गोवा सरकारची भन्नाट योजना, अशी करा नोंदणी

Goa Government Employment Card: गोवा सरकारच्या मदतीने काही क्षणांत सरकारी नोकरी मिळवणं शक्य आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Employment Exchange Card in Goa

पणजी : शिक्षण पूर्ण झालंय, सरकारी जॉब करायचा आहे मात्र 'कसा'? हे काळात नसेल तर आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

सरकारी जॉब हा इतर प्रायव्हेट जॉबच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो म्हणूनच प्रत्येकाला सरकारी काम मिळावं अशी अपेक्षा असते, मात्र सरकारी जॉब म्हटलं की कुणा बड्या आमदाराची ओळख असावीच लागते किंवा एखाद्या राजकारण्याने आपल्या नावाची शिफारस करावी लागते अशा एक ना अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्याच असतील.

पण जर का तुम्ही गोव्यात राहत असाल तर घरबसल्या मोबाईलच्या स्क्रिनवरून काही क्षणात सरकारी काम मिळवू शकता.

Goa Government Employment Card How To Apply

गोवा सरकारने सर्व गोवेकरांसाठी सरकारी जॉबची एक मोठी शृंखला खुली केलीये. या संधीचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला goaonline.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात आधी तुमचा अकाउंट उघडावा लागतो. तुमचा वैयक्तिक ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून काही क्षणात हे सोपं आहे. पुढे लॉगइन (login) केल्यानंतर सर्चबारमध्ये जाऊन Labour and Exchange Card हा पर्याय निवडावा.

हा पर्याय निवडल्यानंतर आपोआप काही नियम व अटी तुमच्या स्क्रिनसमोर येतील, त्या व्यवस्थित वाचून घ्या.

गोवा सरकारचे एम्प्लॉयमेंट कार्ड मिळवण्यासाठी खालील दस्तऐवज महत्वाचे आहेत: (Documents required for employment card in Goa)

१. फोटो (size less than 80kb)

२. १५ वर्षांचा रहिवासी दाखला

३. जर का तुमच्याजवळ १५ वर्षांचा रहिवासी दाखल नसेल तर तुमच्या पती किंवा वडिलांचा रहिवासी दाखल देता येतो.

४. शैक्षणिक पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे (Educational certificate)

५. लग्न झालेलं असल्यास लग्नाचा दाखला (Marriage certificate)

६. कास्ट सर्टिफिकेट

७. एक्स्पीरियंस सर्टिफिकेट (Experience certificate)

८. गरज असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र (GMC/Hospicio/Asilo हॉस्पिटलने जारी केलेले असावे)

९. तुम्ही खेळाडू असल्यास क्रीडा आणि युवक संचालनालयाने जारी केलेला फॉर्म IV

१०. सरकारी नोकरांच्या नोंदणीसाठी N.O.C. फॉर्म

११. गरज असल्यास स्वातंत्र्यसैनिक किंवा बेरोजगारीचा दाखला (Freedom Fighter & Unemployment certificate)

शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक गोवेकरासाठी गोवा सरकारने सुरु केलेला हा सर्वात सुंदर उपक्रम आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयात जाऊन वेळ खर्च करावा लागत नाही.

तुम्ही जर का एखाद्या सरकारी नोकरीसाठी पात्र असाल आणि सरकारी विभागांमध्ये अशी काही जागा रिक्त असेल तर Employment Exchange च्या अधिकाऱ्यांचा फोन येतो आणि घरबसल्या सरकारी नोकरी मिळवली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT