Goa Government: मुर्डी-खांडेपार, सोनारबागचा नियोजित बंधारा रद्द

Murdi Khandepar Dams: ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता, तर पर्यावरणप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्थांनी ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता
Murdi Khandepar Dams: ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता, तर पर्यावरणप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्थांनी ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता
Murdi Khandepar and Sonarbag UsgaoDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मुर्डी-खांडेपार आणि सोनारबाग-उसगावचा नियोजित बंधारा बांधण्याची सरकारची इच्छा नाही, असे सरकार पक्षाच्या वकिलाने राष्ट्रीय हरित लवादाला सांगितल्याने अखेर या बंधाऱ्याचे बांधकाम रद्द झाले. त्यामुळे मुर्डी-खांडेपार व सोनारबाग- उसगावच्या ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

हा एकप्रकारे आमचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुर्डी-खांडेपारचे पंचसदस्य अभिजीत गावडे व सोनारबागचे पंचसदस्य विनोद मास्कारेन्हस यांनी म्हटले आहे. आज मंगळवारी मुर्डी येथील बंधारा बांधकामस्थळी स्थानिकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

राज्य सरकारच्या जलस्रोत खात्यातर्फे मुर्डी ते सोनारबाग बंधारा बांधकामासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन्ही भागांकडील ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता, तर पर्यावरणप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्थांनी ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता.

हा बंधारा बांधल्यास दोन्ही गावांत महापूर येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती, त्यामुळे गेली दोन वर्षे हे आंदोलन सुरूच होते. शेवटी सरकारनेच माघार घेतल्याने बंधाऱ्याचा विषय संपला असून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

१४४ कलमाचा बडगा

गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये राज्य सरकारने मुर्डी-खांडेपारवासीयांचा विरोध पाहता या गावात १४४ कलम लागू केले होते. याशिवाय बंधारास्थळी जाणाऱ्या वाटेवर जलस्रोत खात्याने गेट घालून वाट बंद केली होती, त्यामुळे प्रकरण चिघळले होते. लोकांना जमाव करता येऊ नये यासाठी हे १४४ कलम सरकारने लागू केल्याचा आरोप त्यावेळी ग्रामस्थांनी केला होता, त्यानंतर हे कलम हटवण्यात आले होते.

Murdi Khandepar Dams: ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता, तर पर्यावरणप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्थांनी ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता
Murdi Khandepar News: मुर्डी-खांडेपारवासीयांचे पणजीत धरणे; कलम शिथिल

महापुराच्या भीतीने जोरदार विरोध

हा तर लोकक्षोभाचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया मुर्डी व सोनारबागवासीयांनी दिल्या आहेत. बंधाऱ्याचे बांधकाम करून प्रियोळ मतदारसंघाला तसेच कुर्टी व कुंभारजुवेच्या काही भागाला पाणी पुरवण्याची योजना जलस्रोत खात्याने आखली होती. मात्र, महापुराचा धोका असल्याने आणि २०२१ मध्ये महापूर आल्याने त्याचा फटका मुर्डी व सोनारबागवासीयांना बसला होता, त्यामुळेच विरोध तीव्र झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com