CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक

राज्यात हरित आणि पांढरी क्रांती घडवून आणणे शक्य

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढील 50 वर्षात कृषी क्षेत्रासाठी योजना तयार करण्याचा गोवा सरकारचा विचार आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध करून देणार असून तरुणांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे म्हटले आहे.

(Goa government is planning to formulate schemes for agriculture sector for the next 50 years)

गोव्यातील पहीली शेतकरी कंपनी

सांखळी येथील रवींद्र भवन येथे केंद्र आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या 'डिचोली प्रोग्रेसिव्ह फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड' या गोव्यातील पहील्या शेतकरी कंपनीचे उद्धाटन केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, नवीन कंपनी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळवून देण्यास मदत करेल. अशा प्रकारच्या आणखी कंपन्या सुरू करण्याची गरज असल्याचे म्हणत शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा कंपन्या सुरू करत असल्याचं ते म्हणाले.

राज्यात हरित आणि पांढरी क्रांती घडवून आणणे शक्य

नाबार्डच्या मदतीने राज्यात हरित आणि पांढरी क्रांती घडवून आणणे शक्य आहे, त्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतीत क्रांती घडवण्यासाठी नजीकच्या काळात गोवा राज्यात अशा 12 शेतकरी कंपन्या सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमास आमदार डॉ.चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो, नाबार्डचे अधिकारी मिलिंद भिरूड, योगेश थोरांत, जि.प. सदस्य गोपाळ सुर्लाकर, महेश सावंत, कंपनीचे अध्यक्ष विश्वंभर गावस, प्रदीप तिरोडकर, निलिमा गावस आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT