'Beer' किंमतीचा सरकारने पुनर्विचार करावा; विक्रेत्यांनी केली विनंती

वाढत्या दरामुळे ग्राहकावर नकारात्मक परिणाम होण्याची भिती
excise duty
excise dutyDainik Gomantak
Published on
Updated on

प्रमोद सावंत सरकारने शीतपेयांवर उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राज्यातील विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकारने बीअरच्या वाढत्या उत्पादन शुल्क प्रस्तावाचा (excise duty) पुनर्विचार करावा, कारण बिअर महाग झाल्यास गोव्यात येणारा ग्राहक इतर राज्याकडे वळेल,यात राज्याचेच नुकसान आहे. असे विक्रेत्यांनी म्हटले आहे.

(Beer consumers urge goa govt to rethink excise duty)

excise duty
Cm Pramod Sawant: दिवाळी म्हणजे तेजाचा अंधकारावर अन् सत्याचा असत्यावर विजय

कॉर्पोरेट अफेअर्सचे उपाध्यक्ष, अनसूया रे म्हणाले की, आम्ही प्रशासनाला बीअरवरील उत्पादन शुल्कातील वाढ कमी करण्याची विनंती करतो आहोत. वाढलेल्या किंमतीमुळे बिअरची विक्री कमी होईल आणि उद्योगावर नकारात्मक परिणाम होण्याची भिती आहे. गोव्यात दरवर्षी 8 दशलक्षाहून अधिक देशी आणि विदेशी पर्यटक येतात, त्यामुळे याचा विचार करावा असे ते म्हणाले.

excise duty
Panaji CCTV: पणजीत सीसीटीव्ही आहेत; पण सुरक्षा रामभरोसे

आज, उत्तर भारतातील पर्यटक गोव्यात येताना दारूच्या बाटल्या घेऊन येऊ लागले आहेत. आणि ते त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये पिणे पसंत करतायेत, त्यामुळे सरकार आपला महसूल गमावत आहे. याचा विचार करणे आवश्यक असल्याचं गोवा बार आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष मायकेल कॅरास्को म्हणाले.

गोवा ब्रूइंगचे संस्थापक आणि सीईओ म्हणाले, जर सरकारला आपला महसूल वाढवायचा असेल तर स्ट्रॉंग बिअरवरील उत्पादन शुल्क वाढवले ​​पाहिजे, आणि गोव्यात वापरल्या जाणार्‍या बिअरवरील कर कमी केला पाहिजे. त्यामुळे सरकारने एकतर हार्ड लिकरच्या छोट्या 180 एम एल बाटल्यांवरही अधिक कर लादला पाहिजे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com