Vijai Sardesai |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session : मोफत सिलिंडर योजना गुंडाळली! सरदेसाईंचा सरकारवर आरोप

‘गोवा ग्रामीण ऊर्जा योजने’अंतर्गत 40 कोटी रुपयांची तरतूद केली होती

दैनिक गोमन्तक डिजिटल

भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी प्रचारादरम्यान मोफत तीन गॅस सिलिंडरची घोषणा केली होती. मात्र, सरकारला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ही घोषणा रद्द (स्क्रॅप) झाल्यातच जमा आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर करत या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ‘संकल्पपत्र’ नावाने आपला जाहीरनामा 8 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता. सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात ‘गोवा ग्रामीण ऊर्जा योजने’अंतर्गत गोमंतकीयांना तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील असे सांगून 40 कोटी रुपयांची तरतूद केली.

त्यासंबंधीची फाईल तयार होऊन 26 जून 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चार महिन्यांनी सही करून सदर फाईल अर्थ खात्याकडे पाठवली. यावर खात्याच्या सचिवांनी महागाईचा कमी झालेला दर आणि प्रत्येक महिलेला गृहआधार योजनेतून दिले जाणारे दीड हजार रुपयांचे कारण पुढे करून ही योजना रद्द करण्याची सूचना 13 डिसेंबर 2022 रोजी केली.

त्‍यावर विजय सरदेसाई यांनी आज प्रश्न उपस्थित करत ‘ज्या आयाबहिणींच्या जीवावर आपण निवडून आलात त्यांना आपले उत्तर काय?’ असा थेट सवाल करत सरकारला घेरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT