Air India Expressची गोव्यातून पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू; गोवा-दुबई फ्लाईटच्या उड्डाणांना सुरुवात

आता गोव्यातून दुबईला जाण्यासाठी नवीन फ्लाईट सेवा सुरू करण्यात आली आहे.
Air India Express Flight from Goa to Dubai
Air India Express Flight from Goa to DubaiDainik Gomantak
Published on
Updated on

Air India Express Flight from Goa to Dubai: आता गोव्यातून दुबईला जाण्यासाठी नवीन फ्लाईट सेवा सुरू करण्यात आली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसने दाबोळी विमानतळावरून दुबईला थेट चार साप्ताहिक उड्डाणे सुरू केली आहेत.

यात पहिल्या फ्लाईटने सोमवारी पहाटे 1 वाजता 148 प्रवाशांसह उड्डाण केले आहे.

Air India Express Flight from Goa to Dubai
Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; वाचा गोव्यातील आजचे इंधनाचे दर

माहितीनुसार, विमान कंपनी टाटा समूहाचा भाग आहे आणि ती AirAsia India मध्ये विलीन होणार आहे. या दोन्ही विमान कंपन्या गोव्याला पाच देशांतर्गत शहरे आणि दुबईशी जोडतात.

एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअरएशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंग म्हणाले की, “भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस बॅनरखाली गोव्यातून आमची पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. गोव्याहून दुबईला थेट कनेक्टिव्हिटी देणारी एकमेव एअरलाइन असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

Air India Express Flight from Goa to Dubai
Panchayat By-Election Results: सात प्रभागांचा एकाच तासात निकाल; विजयाचे श्रेय आमदारांना

एअरलाइन्स दाबोळी येथून नवीन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे सुरू करत आहे; कारण भारतीय विमानतळ प्राधिकरणाने व्यवस्थापित टर्मिनलवर अधिक आगमन आणि निर्गमन स्लॉट उघडले आहेत.

AirAsia पूर्वीपासून गोव्याला आणि तेथून दररोज 13 थेट उड्डाणे चालवते. एअर इंडिया एक्सप्रेस सोमवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी गोवा ते दुबई थेट उड्डाणे चालवेल आणि परतीची उड्डाणे बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com