Rohan Khaunte VS Michael Lobo
Rohan Khaunte VS Michael LoboDainik Gomantak

Goa Budget Session 2023-24 : ‘शॅक’वरून खंवटे-लोबो भिडले; काळ्या सूट वाल्यांची नावे जाहीर करा

पर्यटनमंत्री रोहन खंवटेंची मायकल लोबोंकडे मागणी

Goa Budget Session 2023-24: पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि भाजपचेच आमदार मायकल लोबो यांच्यातील वाद आज अधिवेशनात उफाळून आला. आमदार वीरेश बोरकर यांनी मॉडेल शॅक धोरणासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

यावर चर्चा करताना लोबो यांनी ‘काळे सूट घालून येणारे परप्रांतीय राज्यातील पर्यटन धोरण ठरवत आहेत. त्यातील काही जण आपल्याला देखील भेटले’, असा दावा केला. त्यावर खंवटे यांनी लोबोंना ‘त्या’ व्यक्तींची नावे जाहीर करण्याची मागणी केली. मात्र, लोबोंनी या मुद्द्याला बगल दिली.

 Rohan Khaunte VS Michael Lobo
Goa Assembly Session : वीज खात्यालाही भ्रष्टाचाराचे ग्रहण : विजय सरदेसाई

"काळे सूट घालून व्यक्ती कोणाला भेटली असेल, तर लोबोंनी नावे स्पष्ट केली पाहिजेत. काळ्या सूटवाल्यांना घेऊन काही जण बसतात आणि आपली खासगी जमीन विक्री करण्याचे प्रयत्न केले जातात."

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

"गोमंतकीयांना रोजगार व पर्यटकांच्या सुविधांसाठी हणजूण येथे सरकारने भूसंपादन केले होते. मात्र, सध्या त्या ठिकाणी 20 मॉडेल शॅक्स आणि 45 दुकाने बांधली जात आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री, सभापतींना घेऊन जाणार आहे."

- मायकल लोबो, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com