Agriculture  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातीला वेग देण्यासाठी सरकारचे नवे धोरण

सरकारला राज्याला कृषी निर्यात केंद्र म्हणून चालना द्यायची आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातीला वेग देण्यासाठी, राज्याने प्रथमच कृषी निर्यात धोरण (AEP) आखले आहे. यामुळे काजू, आंबा या उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग सुकर होईल.

भात, सेंद्रिय काजू, मिरची, स्थानिक गूळ आणि आंबा यांच्या उत्पादनांमद्धे वाढ करण्यासाठी एकूण सहा कृषी 'क्लस्टर्स' तयार करण्यात येणार आहेत. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी सरकारने योजना आखली आहे.

“कापणीनंतरचे पिकाचे सुमारे 5% ते 30% नुकसान होते. हे नुकसान कमी केले जाऊ शकते आणि ते कमी केले जाणे आवश्यक आहे," असे धोरणात नमूद केले आहे.

सरकारला राज्याला कृषी निर्यात केंद्र म्हणून चालना द्यायची आहे. कृषी क्षेत्रातील उद्योजकता विकासाला प्रोत्साहन द्यायचे आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय असला तरी, राज्याला स्वतःच्या लोकसंख्येचे पोट भरण्यासाठी शेतीयोग्य जमिनीची कमतरता आहे, असे देखील धोरणात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: रासई-लोटली स्फोट! पोलिसांकडून सुरक्षा अधिकाऱ्याला अटक

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

October Heat: गोव्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! पारा 34.5 अंशांवर; पुढील 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT