पणजी: राजधानी पणजीच्या प्रवेशद्वारावरील दिवजा सर्कलजवळ वाहतूक पोलिसांनी सकाळी कार्यालयीन वेळेत वाहतुकीच्या वर्दळीवेळी तेथील सिग्नलची तपासणीचे काम हाती घेतल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांच्या या अनागोंदी कारभारामुळे लोकांना कामावर वेळेत पोहचण्यासाठी मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. अनेक वाहन चालकांनी रहदारीच्यावेळी काढलेल्या या कामामुळे संताप व्यक्त करत होते.
पणजीतील दिवजा सर्कल येथूनच राजधानी शहरामध्ये प्रवेश करता येते. त्यामुळे फोंडा, मडगाव व म्हापसा येथून आलेली सर्व वाहने ही दिवजा सर्कलला फेरा मारूनच पुढे जातात. सकाळी 9.30 ते 10.30 या सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस उभे राहून या वाहतुकीवर नियंत्रण ठेवत असतात. मात्र, आज अचानक तेथे सिग्नल बसवण्यासाठी चाचणी घेण्यात आल्याने तेथील काही मार्ग वाहतुकीसाठी अडवण्यात आला होता. त्यामुळे या सर्ककडून जाणाऱ्या वाहनांची गती कमी झाली होती. खासगी वाहने तसेच प्रवासी बसगाड्याही या वाहतुकीच्या कोंडीत अडकल्याने प्रवाशांना तसेच लोकांना वेळेवर ऑफिसात पोहचता आले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.