Goa Government Employees  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: मुदतपूर्व कर्मचारी निवृत्तीसाठी दोन समित्या स्थापन

त्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबतीत समित्या निर्णय घेतील

दैनिक गोमन्तक

सरकारी खात्यांच्या कारभाराला गती देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून गतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून काहीच दिवसांपूर्वी कामचुकार कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती देण्याच्या कायद्याचीही राज्यात अंमलबजावणी सुरू केली आहे. आता याच्या पुढे जात गोवा सरकारने 50 ते 55 वयोगटातील किंवा 30 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती निर्णय घेण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत.

(Goa government Established two committees for retirement of government employees)

‘अ’ आणि ‘ब’ गटासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या 50 ते 55 वयोगटातील किंवा 30 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती देण्यासाठी या समित्या आढावा घेतील ‘गोवा सिव्हील सर्व्हिस निवृत्ती नियम 2000’ मधील तरतुदींद्वारे सचिव आणि खाते प्रमुखांचा समित्यांत समावेश करण्यात आला आहे. या समित्यांमध्ये विविध गटांचा आढावा आणि प्रतिनिधी अशा दोन समित्या कार्यरत असतील या समित्या ‘अ’ आणि ‘ब’ गटासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या समितीत प्रशासकीय सचिव, खातेप्रमुख, कार्मिक खात्याचे सचिव आणि पोलीस खात्याशी संबंधित कर्मचारी असल्यास पोलिस महासंचालक सदस्य असतील. ‘क’ वर्गासाठी खाते प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात संयुक्त सचिव, कार्मिक खात्याचे संयुक्त सचिव व अतिरिक्त संचालक सदस्य असतील.

या गटांसाठीच्या प्रतिनिधी समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव असतील, तर प्रधान सचिव, प्रशासकीय सचिव आणि दक्षता खात्याचे सचिव सभासद असतील. तर, ‘क’ वर्गासाठी प्रशासकीय सचिवांच्या प्रमुख पदासाठी खातेप्रमुख, विशेष सचिव आणि दक्षता खात्याचे संचालक यांचा समावेश असलेली प्रतिनिधी समिती स्थापन करण्यात आली आहे.

.... तर सरकार संबंधित कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेणार

या समितीने जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर अशा कालावधीत 50 ते 55 वर्षे वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा. त्यांची काम​गिरी चांगली होते की नाही हे पहावे आणि त्यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारला सादर करावा. त्यानुसार सरकार संबंधित कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेईल, असे कार्मिक खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

... त्यांचा विचार मुदतपूर्व निवृत्तीसाठी केला जाईल

दरम्यान, अशा कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही समित्यांना मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. अशांपैकी ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतील प्रामाणिकपणाबद्दल तसेच शारीरिक क्षमतेबाबत संशय निर्माण होईल, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचा विचार मुदतपूर्व निवृत्तीसाठी करावा, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT