Ramesh Tawadkar: अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावल्यास विकासकामांना गती मिळेल

काँग्रेस आपल्या आमदारांना न्याय देऊ न शकल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल. याबरोबर आमदार, मंत्र्यांनी इतर कामांऐवजी राज्याचे धोरण ठरवण्यास अधिक वेळ देणे आवश्यक असल्याचे गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी म्हटले आहे. नुकतीच त्यांनी एका प्रसारमाध्यमास मुलाखत दिली, यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी सभापती तवडकर यांनी भाजपमध्ये दाखल झालेले आमदार, राज्यात विरोधी गट कमी झाला आहे यामुद्यांवर ही भाष्य केले.

(Legislative Assembly Speaker Ramesh Tavadkar expressed Goa political situation )

Ramesh Tawadkar
Goa News: सात पर्यटकांना जीवनदान, तीन बेपत्ता मुलांना शोधण्यात जीवरक्षकांना यश

मुलाखतीदरम्यान गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर म्हणाले की, आमदार आणि मंत्र्यांनी धोरण ठरवण्यात जास्त वेळ घालवणे अपेक्षित असताना ते विकासकामांच्या फायली शोधण्यात व्यस्त आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नवनिर्वाचित आमदारांना शिकता यावे आणि कामकाजात अधिक चांगल्या पद्धतीने भाग घेता यावा यासाठी विधानसभेचे अधिवेशन जास्त काळ चालने आवश्यक आहे. यामूळे नवीन आमदार चर्चेत भाग घेऊ शकतील आणि विधानसभेच्या कामकाजाबद्दल जाणून घेऊ शकतील,” असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या आठ आमदारांचा नुकत्याच झालेल्या भाजपमध्ये प्रवेश

सभापती तवडकर यांना काँग्रेसच्या आठ आमदारांच्या नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे याबाबत विचारले असता, तवडकर म्हणाले की, विलीनीकरण घटनात्मक तरतुदीनुसार झाले आहे. तसेच दोन तृतीयांश गट पक्षातून फुटला आणि भाजपमध्ये विलीन झाला असल्याने हे नियमानुसार आहे. यात आक्षेपार्ह असं काहीच नाही. असे म्हणत यामुद्यावर अधिक भाष्य करणे टाळले. ते म्हणाले की जेव्हा या घटनांना वेग आला होता. तेव्हा ते दिल्लीत होते, परंतु त्याच दिवशी त्यांनी गोवा राजधानीत परतत औपचारिकता पूर्ण केली.

काँग्रेस आपल्या आमदारांना न्याय देऊ न शकल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

एका पक्षाच्या तिकिटावर आमदार निवडून येणे आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे न जाता दुसऱ्या पक्षाकडे जाणे लोकशाहीत आरोग्यदायी आहे का, असे विचारले असता तवडकर म्हणाले की, या आमदारांना आपला पक्ष (काँग्रेस) देऊ शकला नाही, असे वाटले असावे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. असे भाष्य केले.

विरोधक कमी असल्याने सभागृहात बोलण्यासाठी अधिक वेळ मिळेल

विरोधी बाकांचे संख्याबळ 40 पैकी केवळ 7 इतके कमी झाल्याचे निदर्शनास आणून देत यावर आपले मत काय ? असे विचारताच सभापती म्हणाले की, विरोधी गट संख्या कमी असल्याने आता सभागृहात बोलण्यासाठी अधिक वेळ मिळेल. त्यामूळे आपण याचा प्लस पॉइंट म्हणून विचार करू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com