Goa Floods Dainik Gomantak
गोवा

Goa Floods: पुर ओसरून चार दिवस झाले तरी प्रशासनाचा पत्ताच नाही

पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्याना पूर येवून विज खांब, रस्त्ये, मिनी पूल, घरे,भात शेती बागायती यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दैनिक गोमन्तक

मोरजी: गुरुवारी पहाटे पेडणे (Pernem) तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्याना पूर (Goa Floods) येवून लाखो रुपयाची वैयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक स्थरावर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विज खांब, रस्त्ये, मिनी पूल, घरे,भात शेती बागायती यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पूर ओसरून चार दिवस झाले तरीही तळर्ण भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणीच फिरकले नाही. (Goa Government did not come to inspect damage in Pernem taluka area)

Goa Floods

पूर ओसरला मात्र स्मृती कायम राहिल्या आहेत , तळर्ण येथील अंतर्गत 20 मीटर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे . या परिसरात एक मिनी पूल आहे त्या पुलाच्या खाली दोन पाईप घातलेले होते , त्यातून पाणी सरळ गेले नाही त्यामुळे परिसरातील पाणी पूर्णपणे रस्त्यावर आले , पाणी जात नसल्याने अधिक पूरग्रस्त स्थिती जाणवत होती. 20 मीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे उखडून गेला. तळर्ण भागात आज पर्यंत कोणतेच आमदार मंत्री किंवा आपत्कालीन सरकारी यंत्रणेने भेट देवून आमची साधी चौकशी केली नाही, असा दावा येथील नागरिकानी केला आहे.

Goa Floods

रस्ता उखडून गेला त्यामुळे या रस्त्यावरून वाहने कशी चालवणार यांची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग पेडणेच्या अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी राजन कोरगावकर यांनी केली. येथील नागरिकांचे म्हणणे आहे ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी ते आजपर्यंत कुणीच या भागाला भेट दिली नाही , केवळ मिशन फॉर लोकलचे नेते राजन कोरगावकर यांनी या भागाला भेट देवून निदान आमची विचारपूस केली , शिवाय कोणत्या मदतीची गरज आहे ते जाणून घेतले, मात्र आम्ही निवडून दिलेले आमदार मंत्री फिरकले नाही. मंत्री बाबू आजगावकर शुक्रवारी आले ते कुठे आले हे आम्ही ज्या दुसऱ्यादिवशी वर्तमान पत्रे वाचली तेव्हा कळले. आमदार मंत्र्याने आमच्याकडे का पाठ फिरवली असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे .

Goa Floods

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT