Ravi Naik Demise Dainik Gomantak
गोवा

Goa Former CM Ravi Naik Dies : माजी मुख्यमंत्र्यांना अखेरची मानवंदना! गोव्यात तीन दिवसांचा दुखवटा, एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

Goa State Mourning: रवी नाईक यांच्या निधनामुळे गोवा सरकारने महत्त्वाचे दोन निर्णय घेतले आहेत

Akshata Chhatre

Government offices closed Goa: गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषीमंत्री रवी सीताराम नाईक (वय ७९) यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फोंडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्याच्या राजकारणातील या अनुभवी आणि दिग्गज नेत्याच्या निधनामुळे संपूर्ण गोव्यात शोककळा पसरली आहे.

३ दिवसांचा राजकीय दुखवटा आणि शासकीय सुट्टी

रवी नाईक यांच्या निधनामुळे गोवा सरकारने महत्त्वाचे दोन निर्णय घेतले आहेत:

३ दिवसांचा राजकीय दुखवटा: संपूर्ण गोवा राज्यात आज, १५ ऑक्टोबर २०२५ पासून ते १७ ऑक्टोबर २०२५ या तीन दिवसांसाठी राज्य दुखवटा (State Mourning) जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन किंवा कार्यक्रम (Official Entertainment/Programmes) आयोजित केले जाणार नाहीत.

आज सार्वजनिक सुट्टी: आज, बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सर्व सरकारी कार्यालये, स्थानिक/स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि राज्य सरकारी शाळा तसेच शैक्षणिक संस्था आज बंद राहतील.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

रवी नाईक यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता खडपाबांध येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली. "गोव्याच्या विकास मार्गाला समृद्ध करणारे अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोकसेवक म्हणून त्यांची आठवण केली जाईल. दुर्बळ घटकांना सक्षम करण्याबद्दल त्यांना विशेष तळमळ होती," असे मोदींनी म्हटले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांना 'गोमंतकीय राजकारणातील दिग्गज' संबोधले. "मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांच्या समर्पित सेवेने राज्याच्या प्रशासनावर अमिट छाप सोडली आहे. त्यांचे नेतृत्व, नम्रता आणि सार्वजनिक कल्याणातील योगदान नेहमी स्मरणात राहील," असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले. रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील एक अनुभवी नेते होते आणि त्यांनी जवळपास पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय योगदान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

SCROLL FOR NEXT