Tribute to Ravi Naik : नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

Veteran Politician Ravi Naik Dies : पोलिसांना देखील कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडण्याची सक्त सूचना रवी नाईक यांनी केली होती.
Ravi Naik influence in Maharashtra
Ravi Naik DeathDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन झाले आहे. मिश्किल, दिलखुलास, धडाडीचे निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची जनसामान्यांमध्ये ओळख होती.

नगरसेवक, खासदार, आमदार ते मृख्यमंत्री आणि विविध मंत्रिपदं अशी त्यांची असामान्य कारकीर्द होती. गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख आजही राज्याच्या राजकारणात केला जातो. नव्वदमध्ये (१९९०) गुन्हेगारी कृत्यांना चाप बसविण्याचे काम त्यांनी केले होते.

रवी नाईक यांनी नव्वदमध्ये (१९९०) गृहखात्याची जबाबदारी स्वीकारली. याकाळात गोव्यात गुन्हेगारी टोळ्यांनी स्तोम माजवले होते. खंडणी, मारमारी, तस्करी अशा घटना वाढल्या होत्या. रवी नाईक यांनी गुन्हेगारांचे कमंबरडे मोडून राज्यातील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याचे काम केले. अनुचित प्रकारांना रोखण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदाही (NSA) अंमलात आणण्यास कुचराई केली नाही. संशयित गुंडाना ताब्यात घेऊन जामिनाशिवाय चौकशीची तरदूत यात आहे.

Ravi Naik influence in Maharashtra
Ravi Naik: गोव्यातील राजकारणाचा 'रवी' हरपला! पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सावंतांकडून 'श्रद्धांजली' अर्पण

रवींनी राज्यातून गुन्हेगारी कृत्य हद्दपार करण्याचा विढाच उचलला होता. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईचा आजही राज्याच्या विधिमंडळात गौरावाने उल्लेख केला जातो. पावसाळी अधिवेशनात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंनी मुख्यमंत्री सावंतांना गृहखात्याची जबाबदारी रवींकडे द्यावी, अशी टिपण्णी केली होती. रवींच्या धडकेबाज कामाची किर्ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचली होती. गुन्हेगारी कृत्यांविरोधात रवींच्या झीरो टॉलरन्स पॉलिसीने गुन्हेगारांच्या मनात कायमची भीती करुन ठवली.

Ravi Naik influence in Maharashtra
Ravi Naik Passed Away: गोव्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पोलिसांना देखील राजकीय दबावाला बळी न पडण्याची सक्त सूचना रवी नाईक यांनी केली होती. वृत्तपत्रात झळकणाऱ्या वृत्तांपेक्षा कारवाईचा दिर्घकाळ परिणाम दिसून यायला हवा असा त्यांचा पवित्रा होता. पोलिसांनी खात्यातील वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करुन कायद्यानुसार निप:क्षपणे कारवाई करवी, अशी त्यांची भूमिका होती. रवींची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत असणारी भूमिका कायमच राज्यातील जनतेच्या लक्षात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Crime
Curchorem Sexual Exploitation Case
60 Crore Fee Scam
Damu Naik
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com