
फोंडा: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषिमंत्री रवी सीताराम नाईक (Ravi Sitaram Naik) (वय ७९) यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फोंडा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता, खडपाबांध येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
रवी नाईक यांच्या आकस्मिक निधनावर संपूर्ण राज्यातून शोक व्यक्त केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले: “गोव्याचे मंत्री श्री रवी नाईकजी यांच्या निधनाने दु:खी झालो. गोव्याच्या विकास मार्गाला समृद्ध करणारे अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोकसेवक म्हणून त्यांची नेहमी आठवण केली जाईल. विशेषतः, दुर्बळ आणि उपेक्षित घटकांना सक्षम करण्याबद्दल त्यांना विशेष तळमळ होती. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि समर्थकांसोबत आहेत. ओम शांती.”
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही शोकभावना व्यक्त करताना म्हटले: “आमचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील मंत्री श्री रवी नाईकजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. गोवा राजकारणातील ते एक दिग्गज नेते होते. मुख्यमंत्री आणि प्रमुख खात्यांचे मंत्री म्हणून त्यांच्या दशकांच्या समर्पित सेवेने राज्याच्या प्रशासनावर आणि लोकांवर एक अमिट छाप सोडली आहे.
त्यांचे नेतृत्व, नम्रता आणि सार्वजनिक कल्याणातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील. दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला आणि समर्थकांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती.रवी नाईक यांनी गोव्याच्या राजकारणात अनेक दशके सक्रिय योगदान दिले. त्यांचे निधन हे गोव्याच्या राजकारणाची मोठी हानी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.