Goa government criticized |  Dainik Gomantak
गोवा

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Congress slams Goa government: सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन नाईक कुटुंबीय आणि गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या असल्याची टीका काँग्रेसने केलीय.

Pramod Yadav

माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेते रवी नाईक यांच्या निधनानिमित्त गोवा सरकराने तीन दिवसांचा (१५ ते १७ ऑक्टोबर) दुखवटा जाहीर केला आहे. राज्यात दुखवटा असताना कला व संस्कृती संचालनालय, गोवा शासन यांनी वक्रतुंड स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब, सावर्डे यांच्या सहकार्याने आणि स्वयंपूर्ण गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली आहे.

हा प्रकार अत्यंत असंवेदनशील, लज्जास्पद आणि अपमानास्पद असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अशा कालावधीत सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे स्व. रवी नाईक यांच्या स्मृतीचा आणि त्यांच्या परिवाराचा अनादर असल्याचे काँग्रेसने म्हटलंय.

कला व संस्कृती संचालनालय हे थेट राज्य शासनाच्या अखत्यारीत कार्यरत असूनही त्यांनी शोककाळाची पर्वा न करता कार्यक्रम आयोजित केल्याने शासनातील समन्वयाचा अभाव आणि असंवेदनशीलतेचा स्पष्ट प्रत्यय आला आहे. शासनाने तत्काळ हा कार्यक्रम रद्द अथवा पुढे ढकलावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांनी याबाबत एक्सवर पोस्ट करुन निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, रवी नाईक यांचे मंगळवारी (१५ ऑक्टोबर) रात्री निधन झाले राज्य सरकारने राज्यात १५ ते १७ असे तीन दिवसांसाठी दुखवटा जाहीर केला आहे. याकाळात राज्यात कोणताही मनोरंजनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही, असे सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन नाईक कुटुंबीय आणि गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या असल्याची टीका काँग्रेसने केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT